Hot Posts

6/recent/ticker-posts

न्याय सहायक प्रयोगशाळेचे सोलापुरात उद्घाटन

न्याय सहायक प्रयोगशाळेचे सोलापुरात उद्घाटन





सोलापूर, दि.16 – राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने सोलापुरात राज्यातील पाचवी लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळा (फोरेन्सिक लॅब) सुरु करण्यात येत आहे. या प्रयोगशाळेचे उदघाटन महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) हेमंत नगराळे यांच्या उपस्थितीत होते.  ही प्रयोगशाळा जुळे सोलापूर येथील नरसिंह नगर येथे सुरु करण्यात येणार आहे. या लॅबमुळे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील  गुन्हेविषयक तपास कामात गती मिळेल, असे उपसंचालक डॉ. नितीन चुटके यांनी सांगितले.    
          राज्यात न्यायसहायक वैज्ञानिक प्रादेशिक प्रयोगशाळा आठ ठिकाणी आहेत. त्या मुंबई, पुणे, औरगाबाद, नागपूर अमरावती, नाशिक, नांदेड आणि कोल्हापूर येथे आहेत. याचबरोबर चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे आणि सोलापूर या पाच ठिकाणी लघु प्रयोगशाळा सुरु करण्यास मान्यता दिली होती. यापैकी चार ठिकाणी प्रयोग शाळा सुरु झाल्या आहेत. सोलापूरातील प्रयोगशाळेचे उदृघाटन झालं
            सोलापुरातील प्रयोगशाळेस 28 अधिकारी कर्मचारी मंजूर आहेत. त्यापैकी न्यायवैद्यक क्षेत्राशी निगडित सात अधिकारी असणार आहेत. उद्या उदृघाटनाच्या कार्यक्रमास महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे महासंचालक डी. कनकरत्नम, सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक तिलक रोशन,प्रयोगशाळा संचालक कृष्णा कुलकर्णी  आदी उपस्थित
Reactions

Post a Comment

0 Comments