Hot Posts

6/recent/ticker-posts

वेळापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांची धडाकेबाज कारवाई करत चोरा कडून आठ मोटरसायकल हस्तगत

वेळापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांची धडाकेबाज  कारवाई करत चोरा कडून आठ मोटरसायकल हस्तगत 
          वेळापुर पोलिसांनी तिघा मोटरसायकल चोरांना पकडत त्याच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केले .वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे व महेश पोरे हे रात्री वेळी पेट्रोलिंग करत असताना त्यांना आकाश मच्छिंद्र मोहिते व विकास बलभीम लोखंडे व एक अल्पवयीन मुलाकडे बिगर नंबरची हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल सापडली. मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, त्यांच्यावर संशय  आल्याने त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांनी हे मोटरसायकल चोरून आणल्याचे सांगितले. अधिक तपास केले असता दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी वेळापूर शेरी येथून फॅशन प्रो मोटरसायकल चोरल्याचे सांगितले. सदर गुन्हा बाबत वेळापूर पोलीस स्टेशनला कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
                   आरोपी एक-दोन यांना सदर गुन्ह्यात अटक केली त्यांना माळशिरस न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे आरोपीकडून तपास दरम्यान चोरी केलेल्या आठ  मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या ही कामगिरी अकलूज उपाधीक्षक पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, जनार्दन खरे, विनोद साठे, अमोल वाघमोडे, महेश कोरे यांनी केली.
Reactions

Post a Comment

0 Comments