संभाजी ब्रिगेडच्या वतीने अंध रुग्णाला मदतीचा दिलासा. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 23, 2020

संभाजी ब्रिगेडच्या वतीने अंध रुग्णाला मदतीचा दिलासा.

*संभाजी ब्रिगेडच्या वतीने  अंध रुग्णाला मदतीचा दिलासा.* 


 पंढरपूर तालुक्यातील  अंधरुग्ण राजू शेख व त्यांची बहीण निखिल शेख हे अंध  प्रमाणपत्र  मिळविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे तपासणी करता आले असता एम आर आय साठी पुरेसे पैसे नसल्याने व घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांना मदत करून सामाजिक माणुसकी  जपण्याचे कार्य केले. पंढरपूर तालुक्यातील राजू शेख व   हे बहीणभाऊ डोळ्यावरील उपचार करून अंध प्रमाणपत्रासाठी एक जानेवारीपासून सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय मध्ये हेलपाटे घालीत होते उपचारासाठी सिविल प्रशासनाच्या वतीने प्रतिसाद न मिळाल्याने व उपचारासाठी जाण्या-येण्याचा  चार-पाच हजार रुपये खर्च झाल्याने निराश झाले होते. एका सामाजिक कार्यकर्त्याने संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शाम कदम यांच्याशी संपर्क साधून वरील हकीकत सांगितली संभाजी ब्रिगेड उपाध्यक्ष सीताराम बाबर कार्याध्यक्ष अरविंद शेळके यांनी लगेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या अंध रुग्णांना डॉक्टरांकडे उपचारासाठी  घेऊन गेले नगरसेवक बाबा मिस्त्री यांचे ही याकामी सहकार्य लाभले संबंधित डॉक्टरांनी डोळ्याची एमआरआय  तपासणी  करणे प्रत्येकी 2375 रुपये  शासकीय  फी भरण्यास सांगितले त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने व जवळचे पैसे प्रवास खर्चात संपल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांचा एमआरआय वरील खर्च उचलून सामाजिक माणुसकी जपले. याबाबत त्या अंध रुग्णांनी संभाजी ब्रिगेड चे आभार मानून सामाजिक कार्याचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages