Ads

Ads Area

सांगोला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भामाबाई जाधव यांची बिनविरोध निवड...

सांगोला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भामाबाई जाधव यांची बिनविरोध निव


सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका भामाबाई जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा राणीताई माने, नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड,युवा नेते नाथा जाधव, सर्व पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका ,नगरपालिकेचे विविध पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांची निवड घोषित करताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात सांगोला शहरातून भामाबाई जाधव यांची  भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. 
                     या मिरवणुकीच्या वेळी प्रसिद्ध सिनेअभिनेता सुमित पुसावळे यांनी उपस्थितांना  अभिवादन केले.तर येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या माध्यमातून आपली आजी उत्कृष्ट कार्य करेल.अशा शुभेच्छा दिल्या. तर नूतन उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव यांनी आपणाला मिळालेल्या संधीचे सोने करत राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष,आणि जिल्ह्याचे नेते दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा चौफेर विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, शहर वासीयांच्या अडीअडचणी प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न ही आपण करणार असल्याचे सांगितले. यावेळी नाथा जाधव युवा मित्र परिवाराच्या वतीने नूतन उपनगराध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला. तर दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयात नूतन नगराध्यक्षा भामाबाई जाधव आणि सिनेअभिनेता अमित पुसावळे यांचा सत्कार जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
                   या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय राहिली. भामाबाई जाधव यांच्या निवडीने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close