तानाजी चित्रपटाच्या प्रेरणेसाठी केदार बंधूंचा अनोखा उपक्रम,हॉटेल संगम मध्ये मिळतेय जेवणाच्या बिलात दहा टक्के सूट.
सांगोला (जगन्नाथ साठे) १० जानेवारी रोजी संपूर्ण देशात बहुचर्चित आणि ऐतिहासिक तानाजी हा चित्रपट प्रसिद्ध झाला.शिवाजी महाराजांचा जिवलग मावळा म्हणून तानाजी मालुसरे प्रसिद्ध होते.त्याच तानाजीच्या जीवनावर आधारित अजय देवगण,काजोल,सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिकेने या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगलीच कमाई केली.सांगोला येथील शिवपार्वती सिनेमा गृहाच्या समोर अक्षरश सिनेरसिकांना "house full" चे बॅनर पहावे लागत आहेत. ऐतिहासिक तानाजी हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पहावा,आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जागता रहावा या हेतूने अकोला येथील प्रवीण केदार आणि नवनाथ केदार यांनी कमलापूर येथील आपल्या संगम हॉटेलवर "तानाजी "चित्रपटाचे तिकीट दाखवा आणि शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणावर दहा टक्के सूट मिळवा, असे बॅनर सर्वत्र लावले आहेत,चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून येथून शो संपेपर्यंत ही अनोखी योजना सुरू असणार आहे. हॉटेल संगम येथे अनेक सिनेरसिक आणि विशेषतः फॅमिली येवून सुरुची भोजनाचा आस्वाद घेत आहेत.स्पेशल मच्छी फ्राय,मटण थाळी ही या हॉटेल ची खास खासियत आहे.केवळ शिवाजी महाराजांच्या आणि तानाजी मालुसरे यांच्या विचाराने जागृत राहावे,तानाजीचा खरा इतिहास सर्वांना माहीत व्हावा,या हेतूने चित्रपटाचे तिकीट दाखविल्यास शाकाहारी व मांसाहारी जेवणावर दहा टक्के सूट दिली जात आहे, आतापर्यंत पाचशे ते सहाशे सिनेरसिकांनी लाभ घेतला आहे, केवळ एक शिव भक्त म्हणून हा विचार सुचला आणि तो अंमलात आणला--प्रविण केदार तरी सांगोला शहर आणि परिसरातील जास्तीत जास्त सिनेरसिकांनी हा चित्रपट पहावा आणि हॉटेल संगम ला भेट द्यावी, असे आवाहन हॉटेल चे मालक प्रविण केदार,आणि नवनाथ केदार यांनी केले आहे.
0 Comments