Ads

Ads Area

संघर्षातून गांधीजी घडत गेले - डाॅ पंडीत लांवड


                      संघर्षातून गांधीजी घडत गेले - डाॅ पंडीत लांवड 

अकलूज( प्रतिनिधी)  शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज राज्यशास्त्र विभाग व इंग्रजी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम व्याख्यान ते बोलत होते. 
    शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  जयसिंह मोहिते-पाटील व महाविद्यालय विकास समीतीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे प्रेरणेने व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ आबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम विचार परीक्रमेतील गांधीजींनी लिहलेली पुस्तके या विषयावर पाचवे विचार पुष्प गुंफतांना त्यांनी व्यक्त केले.
  हिंद स्वराज्य व माझ्या स्वप्नातील भारत ही गांधीजीनी लिहलेले पुस्तके या पुस्तकाची निर्मीती, पुस्तकातील महत्वाचे कंगोरे, आलेले अनुभव व केलेले प्रयोग या आधारे पुस्तकात केलेली मांडणी करताना गांधीजींवर प्रत्येक ठिकाणी संघर्ष सांगीतला आहे. या संघर्ष प्रत्येक भारतीयाला आपल्या अधिकारींची व हक्काची जाणिव करून देतो म्हणूनच नैतीक अस्त्राची देणगी गांधीजींनी स्वातंत्र्यपुर्व कालखंडातच करून दिली आशी भुमीका त्यांनी मांडली साॅक्रीटसची संवाद शैली जी प्लेटोने मांडली तशाच स्वरूपात गांधीजींनी हिंद स्वराज्य पुस्तक लिहले आहे असाही विचार त्यांनी व्यक्त केला. माझ्या स्वप्नातील भारत मांडताना समाज जीवनाशी व नवराष्ट्र् निमर्तीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी गांधीजींनी सांगीतल्या आहेत हा मोलाचा विचार आपण स्विकारायला पाहीजे 
   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा विष्णु सुर्वे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. विश्वनाथ आवड यांनी केले. 
    या कार्यक्रमासाठी, डाॅ बाळासाहेब मुळीक, डाॅ. विशाल साळुंखे, डाॅ चंद्रशेखर ताटे देशमुख , डाॅ चंकेश्वर लोंढे , डाॅ नवनाथ पवार, सुनील कांबळे सर, रोहित देशमुख सर अमोल खरात, वैभव आंबेकर गांधी विचारधारा प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी उपस्थीत होते.
  कार्यक्रम यशस्वी करणेसाठी राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतीक विभाग, राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन  कुमारी प्रज्ञा गायकवाड हिने केले तर आभार कुमारी विशाखा शेंडे हिने मानले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close