दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ फुलला बालचमुंचा बाल आनंद बाजार
दि१३/०१/२०२० वार सोमवार रोजी दिलीपराव सोपल प्रशाला व दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या दोन्ही शाळेच्या विद्यमाने दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ भव्य बाल आनंद बाजार दिमाखात संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई(ठोंगे) या संस्थेच्या सचिव .तेजस्विनीताई ठोंगे व प्रमुख पाहुणे अनिल बनसोडे (प्रशासन अधिकारी न.पा. शि.मं, बार्शी)व संजय पाटील (पर्यवेक्षक) उपस्थित होते.
चंद्रकांत चोबे,पाटील गुरुजी,चंद्रकांत लोखंडे यांच्या उपस्थितीत सदर आनंद बाजार संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व बाल आनंद बाजार चे फीत कापून उदघाटन झाले विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक बौद्धिक गुणांना चालना देऊन विकास व्हावा या दृष्टीने बालआनंद बाजार भरवला जातो . भविष्यात मुलांना सेल्स मार्केटिंग या व्यवसायाची गुणात्मक बौद्धिक वृद्धी व्हावी म्हणून हा स्तुत्य उपक्रम आहे असे उदघाटनप्रसंगी प्रशासन अधिकारी श्री अनिल बनसोडे साहेबांनी सांगितले विध्यार्थ्यांना आनंद बाजार साठी शुभेच्छा दिल्या आनंद बाजार मध्ये मुलांनी १३० स्टॉल मांडून भाजीपाला,स्टेशनरी समान,भेळ,भजी, कटलरी समान, विविध फळे, इमिटेशन ज्वेलरी,किराणा सामान ,गृहउपयोगी सामान इत्यादी मांडून त्यांची विक्री केली या आनंद बाजारात ३२२३० रुपयांची उलाढाल झाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवराज जगताप, सुनील लंगोटे,मंगेश मोरे, श्रीकांत कुंभारे सचिन काळे, संतोष ठोंबरे,राहुल ठोंगे,संगीता काळे,अरुणा मठपती,विलंबिनी पाटील तसेच सेवक संदीप भोरे दत्ता ठोंगे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments