अकलूज मध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 24, 2020

अकलूज मध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न



अकलूज मध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न

रोहन सुरवसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले होते रक्तदान शिबिर.  स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन भैय्या सुरवसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले असून तमाम युवा कार्यकर्त्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.  स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील हे सामाजिक चळवळीतील कर्तुत्वान व कर्तव्यदक्ष युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात आहे. यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने अकलूज येथे राऊत मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये विविध जिल्ह्यातून आलेले रोहन सुरवसे पाटील मित्र मंडळ तसेच कार्यकर्ते यांनी  रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान केले. यावेळी दोस्ती ग्रुपचे संस्थापक अण्णासाहेब सुरवसे, नितीन जाधव, राजाभाऊ जाधव, नवनाथ काशीद, मुस्तफा शेख, श्रीनाथ सुरवसे ,तात्या  खटके, विकी काशीद, गफार शेख, रोहन कुदळे ,विठ्ठल बोडके, सुरज मंडवळे, बाळासाहेब सुरवसे, हनुमंत आबा सुरवसे, विजू भाऊ जाधव ,भैय्यासाहेब पोळ व तमाम युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages