समाजकार्याचा ध्यास घेतलेला कर्तृत्ववान युवा नेतृत्व- रोहन सुरवसे- पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 24, 2020

समाजकार्याचा ध्यास घेतलेला कर्तृत्ववान युवा नेतृत्व- रोहन सुरवसे- पाटील

समाजकार्याचा ध्यास घेतलेला कर्तृत्ववान युवा नेतृत्व- रोहन सुरवसे- पाटील

मी समाजाचा देणे लागतो हा व उद्दात्त आणि निर्मळ हेतू समोर ठेवून, ज्यांनी समाजासाठी अखंड आयुष्य पणाला लावून समाज विकासात स्वतःला झोकून दिले अशा मोठ्या थोरांचा आदर्श आणि त्यांचे विचार नजरेसमोर ठेवत समाज कार्याचा ध्यास घेतलेला कर्तुत्वान युवा नेतृत्व स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे- पाटील  रोहन सुरवसे पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील आपल्या कोंडबावी गावातून समाजकार्याचा विडा उचलला आणि आपल्या पारंपरिक व्यवसायाशी सांगड घालत त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. मनमिळावूपणा, सोज्वळ, नम्रता, संयम, उत्कृष्ट वाणी आणि सौजन्य या विविध गुणांमुळे त्यांच्या सानिध्यात तमाम युवावर्ग येऊ लागला तर त्यांच्या सहकार्याने त्यांनी तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. देशातील सत्ताधीशांच्या मुलांना आपोआप राजकारणात समाजकारणात संधी मिळत जाते आणि ते संधीचे सोने ही करीत असतात.परंतु कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना  राजकारणात समाजकारणात कर्तुत्व दाखवायचे म्हणले  तर वाट्याला हा संघर्ष येतच असतो. अशाच प्रकारे रोहन सुरवसे पाटील यांनी समाज हितासाठी त्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करीत समाज सेवेचे नवे पर्व नवी दिशा आणि नवी आशा बाळगून उच्च विचारसरणी, उच्च महत्वकांक्षा प्रकाशझोतात आणून त्यांनी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेची स्थापना केली. व त्या माध्यमातून  सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचे प्रयत्न करू लागले. तारुण्याची उर्मी, स्वप्नपूर्तीचा ध्यास आणि ध्येय प्राप्तीची ओढ असलेला युवक सामाजिक चळवळीतील युवा नेतृत्व म्हणून कौतुकास्पद ठरू लागले. समाजाचे आणि आपल्या मातीचे इमान राखणारी ऊर्जा राज्याच्या विविध जिल्ह्यात प्रकाशझोतात येऊ लागली.  ज्यांना अंतःकरणपूर्वक समाजहिताचे कार्य करायचे असेल तर त्यांना राजकारणाशिवाय पर्याय नसतो किंवा त्यासाठी राजकीय वारसदार असावे लागते. परंतु कोणत्याही प्रकारचा राजकीय वरदहस्त नसताना केवळ समाज आणि समाजसेवा करायची हा उद्देश ठेवून रोहन सुरवसे- पाटील यांनी स्वाभिमानी ब्रिगेडच्या माध्यमातून दखलपात्र असेच समाजकार्य केले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना दिल्ली येथे एका संस्थेने मीराताई कुमार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्वसामान्यांसाठी सतत झटणाऱ्या मनमिळावू युवक नेतृत्वात त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा... दोस्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages