श्री महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्तम प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 24, 2020

श्री महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

श्री महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

  सोलापूर दिनांक - श्री महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव  मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने आज रोजी 24 जानेवारी  दुपारी तीन वाजता विविध शाळा व महाविद्यालय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी या स्पर्धेत कुचन प्रशाला, बिटला प्रशाला सौ.भु म पुल्ली कन्या प्रशाला,अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, कै. व्यंकटनरसु विरय्या सिंगम प्राथमिक शाळा ,आदि शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवले. याप्रसंगी जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कटकुर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोध्दूल, संस्थापक सचिव अनिल वासम जन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष राजू कोंगारी, कुचन प्रशालेचे मुख्याध्यापक शरद पोतदार आदी उपस्थित होते. या चित्रकला स्पर्धेस श्री मार्कंडेय रथोत्सव श्री मृत्युंजय मार्कंडेय यांचे भारतातील विविध ठिकाणी असणाऱ्या श्री मार्कंडेय यांचे श्रीक्षेत्र आदी विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर चित्र रेखाटले आहे. यावेळी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती श्रीनिवास कटकूर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages