शरद पाटील यांच्या कवितेस राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] माढा तालुक्यातील आढेगांव येथील शरद पाटील यांच्या कवितेस पुणे येथील मराठबोली-पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या खुल्या राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ज्येष्ठ लेखिका रश्मी गुजराथी यांच्या हस्ते मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज पुणे येथे रविवार दि.१२जानेवारी २०२०रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व आजची विदारक परिस्थिती यावर आधारीत कवितेचे लेखन शरद पाटील यांनी केले होते.याअगोदरही शरद पाटील यांना काव्यलेखन व काव्यवाचन स्पर्धेत पारितोषिके मिळालेली आहेत. यावेळी त्यांना काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळाल्याने राष्ट्रसेवा परिषद संचलित मराठबोली पुणे या संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या काव्यलेखन स्पर्धेत राज्यभरातून १८९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
यावेळी मराठबोली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर उमरदंड,सुभाष कदम, शिवाजी भापकर, परीक्षक सूनेत्रा गायकवाड सीमा गांधी, हेमलता चौधरी वैशाली गावडे व योगिता पाखले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी गुजरे यांनी केले.
0 Comments