निसर्ग संवर्धनाच्या व पत्रकाराच्या प्रयत्नातून वाचले 'सागरी घारी'चे प्राण
टेंभुर्णी शहरातुन कौतुकाचा वर्षाव
टेंभुर्णी ( प्रतिनिधी )
आप्पा सरवदे यांना टेंभुर्णी येथे एक सागरी घार जखमी अवस्थेत सापडली, तत्परता दाखवत डॉक्टर राजेश अंकुश (सोलापूर ) यांनी निसर्ग संवर्धन केंद्र पंढरपूर येथील श्रीकांत बडवे यांच्याशी संपर्क साधला सर्व गोष्टींचा आढावा घेऊन पुढील उपचारासाठी घारीला पंढरपूरला पाठवणे गरजेचे होते.
पुढे लगेच टेंभुर्णी वृत्तपत्र एजंट व पत्रकार
गणेश स्वामी यांनी टेंभुर्णी चे समाजसेवक गणेश भणगे यांच्या मार्फत घार पंढरपूरला पाठविण्याची सोय केली.
निसर्ग संवर्धनची रेस्क्यु टीम प्रकाश शेटे सर व .विनय बडवे सर यांच्या सह घारीवर उपचारास सुरवात केली.या सर्व घटना एवढ्या तातडीने झाल्या घार ९:३० ला पंढरपुरमध्ये आली व तपासणी करून पुढील उपचार सुरू करता आले.
घारीची अवस्था खुपच कठीण होती आणि आहे कारण तिच्या पंखाचे हाडच पुर्णपणे मोडले होते शिवाय तीच्या तोंडातून रक्तस्त्रावही होत आहे.या सर्व गोष्टी वनविभागाला कळवून(वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते) उपचार केले ते येथीलच सरकारी दवाखान्यात जवळ जवळ दोन तास केले.येथील डाॅक्टरांनी हाड जुळण्या करीता उपाय करून पंख हालनार नाही याची सोय करून दिली.
घार जखमी असुनही तीने आपल्या नख आणि चोचीने दोन्ही डाॅक्टरांवर केलेला हल्ला तीच्यासाठी वेदनादायक व डाँक्टरांसाठी धोकादायक होता.
सध्या घार पुढील सुश्रुशाकरिता वनविभागाकडे सुपुर्द केली आसुन
डाॅ.राजेश अंकुश सर व टेंभुर्णी शहरातील तरुणांच्या सहकार्याने तसेच वनविभाग आणि सरकारी डाॅ सर्वाच्या तळमळी मुळे सध्या तरी घारीचे प्राण वाचविता आले.
0 Comments