आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते लोधी समाज वन शितला देवी मंदिर येथे यात्री भवनाचे स्लॅब घालण्याच्या कामाचा शुभारंभ*
सोलापूर:- दिनांक 4 डिसेंम्बर 2019
लोधी समाज वन शितलादेवी मंदिर येथे विविध ठिकाणाहुन दर्शनासाठी येणाऱ्या लोधी समाज बांधवांची निवासाची सोय व्हावी या करिता आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून ( दहा लाख) यात्री भवन बांधण्यात येत आहे आज रोजी या बांधकामाचा स्लॅब (छत) घालण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की लोधी समाजातील महिला विडी कामगारांचा प्रश्न, बांधकाम कामगारांचा प्रश्न, वाळू तुटवडा, युवकांचा रोजगाराचा प्रश्न तसेच लोधी समाजाचा कुठलाही प्रश्न असो ते सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच भरघोस मतदान करून तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार ही यावेळी व्यक्त केले.
यावेळी लोधी समाजातील जेष्ठ हनुमानसिंग चौधरी, लक्षणसिंग बंबेवाले, माणिकसिंग मैनावाले, नागनाथ कल्लावाले, रामसिंग आंबेवाले, परशुराम सतारेवाले, संजय मैनावाले, सुमित मनसावाले, नामदेव मनसावाले, महेंद्र बुहरहानपुरे, रवी आंबेवाले, युवराज पंतुवाले, प्रताप मनसावाले, राजेश सकी, सुभाष मनसावाले, शोभराम शिवसिंगवाले, रिसालदार, सीताराम लंगडेवाले, खंडेवाले, मोहन हजारीवाले, उमेश फटफटवाले, अशोक बोकेवाले, विट्ठलसिंग कैय्यावाले, लक्ष्मण चौधरी, राणोसिंग सतारेवाले, अर्जुन शिवसिंगवाले, चंदुसिंग मनसावाले यांच्यासह लोधी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments