वस्ताद रामभाऊ गंगाराम औसेकर यांचे दुःखद निधन
पंढरपूर शहरातील चिंचबन तालीमीचे वस्ताद व जुन्या काळातील नामवंत मल्ल रामभाऊ गंगाराम औसेकर(वय ७३) यांचे मंगळवार दिनांक ३ डिसेंबर रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.राम औसेकर यांचा कुस्तीक्षेत्रातील केलेल्या कार्यामुळे अनेक पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.रुस्तुम ए हिंद सतपाल यांच्यासोबत त्यांनी दिलेली लढत संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती.त्यांच्या मार्गर्शनाखाली पंढरीत अनेक मल्लानी कुस्तीविद्येचे धडे घेतले होते.
त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सुन असा परिवार आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी अमृत औसेकर यांचे ते वडील होत.
0 Comments