Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी आ राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोमहर्षक विजय मिळवला.

मोहोळ,प्रतिनिधी
मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी आ राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रोमहर्षक विजय मिळवत नुतन आमदार यशवंत विठ्ठल माने यांना तब्बल २१ हजाराच्या विक्रमी मताधिक्‍याने विजयी केल्याबद्दल तसेच मोहोळ मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींनी विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवत,विरोधकांना चारीमुंड्या चीत करत राष्ट्रवादीवर पुनश्च ठाम विश्वास दाखवत बहुमताने विजयी करत पुनश्च विकासाची संधी दिली.म्हणून त्या मतदार बंधू भगिनींचे आभार आणि त्यांनी विकासाच्या दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गावागावात जाहीर आभार आणि कृतज्ञता दौऱ्याचे आयोजन आज पासून दि.७ ते १४ डिसेंबर असे करण्यात आले आहे.
विकासाची दिशा नवी-सदैव तुमची साथ हवी हे स्लोगन जनतेने सार्थ ठरवले असून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत जाहिर आभार व्यक्त करण्याची माजी आ राजन पाटील यांनी इच्छा व्यक्त केली होती,त्या नुसार नूतन आमदार यशवंत विठ्ठल माने यांच्या समवेत ते आजपासून मोहोळ तालुक्यातील गावासह सर्वच गावांचा जाहीर आभार व कृतज्ञता दौरा काढणार आहेत.
केवळ पंधरा दिवसात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याची परंपरा अबाधित ठेवत माजी आ राजन पाटील यांनी पुन्हा एकदा यशवंत माने यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मजबूत ठेवला असून याकामी जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील व प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांची प्रचारनीती कामाला आली,त्यांनी स्वयंप्रेरणेने प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर केलेल्या संपर्का चे रूपांतर मतात परिवर्तन झाल्याचे दिसून आले.गेल्या पंचवीस वर्षापासून राजन पाटील यांचे मोहोळ मतदार संघावर वर्चस्व असून ते स्वतः पंधरा वर्ष येथील आमदार म्हणून काम पहिले आहे.

चौकट-
मोहोळ तालुक्यातील मतदारांचे जाहीर ऋण व्यक्त करण्यासाठी  दि.७ ते १४ डिसेंबर दरम्यान मोहोळ तालुक्यातील सर्वच गावात आम्ही "आभार व कृतज्ञता" भेट दौऱ्यासाठी येणार आहे.यावेळी सर्व कार्यकर्त्याशी व जनतेबरोबर संवाद साधणार आहे.
तरी या प्रसंगी कोणीही हार,तुरे किंवा सत्कार करू नये,तसेच फटाके वाजवु नये,असे आवाहन माजी आ
राजन पाटील यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments