Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई च्या फ्यामडेन्ट चा डेंटल ऑस्कर एक्सैलेन्सी अवॉर्ड डॉक्टर स्मिता कोले यांना











मुंबई च्या फ्यामडेन्ट  चा  डेंटल   ऑस्कर एक्सैलेन्सी अवॉर्ड डॉक्टर स्मिता कोले यांना

'डॉक्टर स्मिता कोले 'या कॉलेज डेंटल क्लिनिक च्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे सोलापूरांना दंत  सेवा देत आहेत त्यांच्या या कार्याची दखल मुंबईतील फॅम्डेट या संस्थेने घेतली आहे. 
डॉक्टर  स्मिता कोले यांना एस्थेतिक प्रॅक्टिस ऑफ द इअर चा विनर अवॉर्ड  प्रदान करण्यात आला...      
मुंबई येथील अंधेरी वेस्ट भागात 'द क्लब' येथे हा सोहळा संपन्न झाला. या पारितोषिकाचे  चे वितरण मुंबईचे सेलिब्रिटी डेंटिस्ट 'डॉक्टर मिलिंद करमरकर 'यांच्या हस्ते झाले,हा पुरस्कार 'डॉक्टर स्मिता कोल्रे यांना प्रदान करण्यात आला यावेळी देशभरातील नामवंत डेंटिस्ट तिथे उपस्थित होते.

हायली कमांडेड  एस्थेटिक डेंटिस्ट प्रॅक्टिस 2018 नावाचे पारितोषिक त्यांनी यापूर्वी मिळवलेले आहे, पुन्हा प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवली . त्यांचा  उत्कृष्ट स्टाफ आणि त्यांचे पती  नितीन कोले व दोन मुली  यांच्या सहकार्यामुळे त्यांनी ह्या वर्षी डेंटल ऑस्कर फामदेंत
एक्सीलेंस इन देंतिस्ट्री एस्थेतिक प्रॅक्टिस ऑफ द इयर 2019 ही विनर ची ट्रॉफी त्यांनी संपादित केली.

तसेच हे पारितोषिक मिळविल्याचे श्रेय त्यांनी आपल्या सोलापुरातील त्यांचे पेशंट आणि त्यांचा डेंटल स्ताफ यांनाही दिले  कारण त्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच मी एक चांगली सेवा देऊ शकले असं मत  डॉक्टर स्मिता प्रांजळपणे व्यक्त करतात.

देगलूर सारख्या छोट्याशा गावात दहावीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केल्या नंतर डॉक्टर बनायचंच या जिद्दी पोटी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या लातूर मधून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले रशियामधील प्रथम क्रमांकाच्या कॉलेजात जीडीसी मुंबईमध्ये बीडीएस डिग्री मिळवली . 

खरंतर मुलगी असल्यामुळे घरात पुढच्या शिक्षणाला जरा विरोधच होता कारणही तसंच होतं की मुलगी जास्त शिकली तर मुलगाही जास्त शिकलेला मिळाला पाहिजे ,, परंतु डॉक्टर स्मिता यांनी मोठ्या हिमतीने घरातील मोठ्या मंडळींना व आई वडिलांना  विश्वासात घेऊन आपलं हे बीडीएस प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केल.

डेंटिस्ट म्हणून करिअर स्वीकारताना त्यांना डॉक्टर संदेश मयेकर यांचे लेक्चर अटेंड करायला मिळालं तेव्हा त्यांनी ठरवलं की  एखाद्या पेशंटच्या चेहऱ्यावरील हसू आपल्याला परत मिळवून द्यायचं असेल तर आपण एस्थेतीक डेंटिस्ट व्हाव, मला पोस्टग्रज्युएट करता आलं नाही परंतु लोकांच्या चेहऱ्यावरची स्माईल वाढविण्याचे काम आपण नक्की करू असे ठरवून त्यान्नी डेंटिस्ट करिअरला सुरुवात केली.जपान, दिल्ली, कलकत्ता, मुंबई सारख्या शहरातून अनेक कोर्सेस करून डॉक्टर राजीव वर्मा , डॉक्टर प्रशांत  हटकर सरांच्या मार्गदरशनाखाली ही प्रॅक्टिस पुढे वाढवली .
त्या सोलापुरातील एकमेव डिजिटल स्माईल डेझाईनर आहेत.... पेशट्सची स्माईल सुरेख बनवणे हा त्यांचा आवडता विषय आहे.
अथक परिश्रम आणि सोबत असलेल्या स्टाफ मेंबर च्या सहकार्यामुळे आणि सर्वात महत्वाचे इथे येणाऱ्या पेशंट मुळेच मला हा सन्मान मिळाला हा सन्मान मी सर्व सोलापूरकरांना समर्पित करते कारण हे पारितोषिक म्हणजे सोलापूरच्या वैभवात भर घालणारी गोष्ट आहे असे मला वाटते असे अभिमानाने स्मिता कोले सांगत होत्या.
Reactions

Post a Comment

0 Comments