माजी केंद्रीय कृषिमंत्री व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
महाविकास आघाडी पुणे कॅन्टोन्मेंट विभागातर्फे
भव्य रक्तदान शिबीर संपन्न
माजी केंद्रीय कृषिमंत्री व लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी पुणे कॅन्टोन्मेंट विभागातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले . पुणे कॅम्पमधील बुटी स्ट्रीटवरील परमार हॉलमध्ये झालेल्या या रक्तदान शिबिराचे उदघाटन रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांच्याहस्ते करण्यात आले . या रक्तदान शिबिरात ५० पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले .
या रक्तदान शिबिराचे आयोजन निखिल धोंगडे , कुणाल कांबळे , हरपालसिंग जगदेव ,प्रतिक चव्हाण ,अजिंक्य यादव , रुणाल जाधव , कार्तिक अहिर , गौरव वाघ ,अजिंक्य गायकवाड , तन्मय घुले विशेष परिश्रम घेतले . या शिबिरास प्रमुख पाहुणे मुनीर सय्यद , विकास भांबुरे , अमोल केदारी , जनार्दन जगताप , वसंत जैन , फिरोज मुल्ला , गौसिया खान , रुकसार खान , अजीम गुडाकूवाला , लकी बेलानी , वॉज सर , संतोष बिडकर , भोलासिंग अरोरा, मोहम्मद अजहर चौधरी , विनायक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .
या रक्तदान शिबिरासाठी पी एस आय ब्लड बँकेचे डॉ अभिजित अहिर , ब्लड बँकेचे मॅनेजर उध्दव चौधरी , रंजना चंदनशिवे , अलका परगे , सुमेगा घोडके व अनिस शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले .
रक्तदान केलेल्याना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला .

No comments:
Post a Comment