Ads

Ads Area

चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा


चिमुकल्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
पुणे ता  :- स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंदाचा जल्लोष हाच अनुभव पालकांना आला जीजीआयएस अथ (प्री प्रायमरी स्कूल)च्या स्नेहसंमेलनच्या कार्यक्रमात. जीजीआयएस अथच्या पिंपरी,चिंचवड, रहाटणी, बावधन, या सर्व शाखेतील मुलांसमवेत हा सोहळा पार पडला. आपल्या देशाची संस्कृती या थीम वर नृत्य,नाटिका अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेळी करण्यात आले होते. यातून विविधतेतून एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे हा संदेश त्यातून चिमुकल्यांनी दिला. रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र,काश्मीरपंजाबउत्तराखंडबिहारकेरळकर्नाटकगुजरात अशा वेगवेगळ्या राज्यातील समृद्ध संस्कृती व परंपरेचा भव्य वारसा नृत्याच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, कर्तव्यदक्षता, नियोजनबद्धता तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अहिंसा, इतरांबद्दल करुणा असे  अनेक विचार जोपासले जावेत असा संदेश  याप्रसंगी देण्यात आला. 
यावेळी गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता,मुख्याध्यापिका भारती भागवानी, समस्त शिक्षक, पालकही उपस्थित होते. यावेळी छोट्या कलाकारांनी केलेली आकर्षक वेशभूषा, मनमोहक सादरीकरण यातून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. 
 मुलांच्या पंखांना बळकट करण्यासाठी लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये आपली संस्कृती आणि परंपरा रुजविणे महत्वाचे आहे. आपल्या समृद्ध परंपरेचा वारसा जपण्यासाठी तो गोष्टीच्या, नाटकाच्या व इतर अनेक गोष्टींतून मांडला गेला पाहिजे. यातूनच तो नवीन पिढीपर्यंत पोचून मग पुढे जोपासला जाईल. अशा भावना  सोनू गुप्ता यांनी व्यक्त केल्या. 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close