घेरडी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवंडवस्ती नं १.(आगलावेवाडी) येथे "महापरिनिर्वाण दिन" साजरा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवंडवस्ती नं १.(आगलावेवाडी) केंद्र जवळे ता. सांगोला जि. सोलापूर येथे महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका सौ. सुनिला कोळेकर मॅडमनी केले. तद्नंतर उपशिक्षक श्री. गणेश व्हनखंडे सरांनी विद्यार्थ्यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. इ. १ली ते ४थीतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेटे देण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी अंगणवाडी सेविका श्रीम. शुभांगी नरळे उपस्थित होत्या.
0 Comments