Ads

Ads Area

कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या खेळाडूंनी खो-खो स्पर्धेमध्ये व्दितीय क्रमांक







कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या खेळाडूंनी खो-खो स्पर्धेमध्ये व्दितीय क्रमांक
पंढरपूर प्रतिनिधी दि.०६ महाष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्तविद्यमाने दि. २७  ते ३० नोव्हेंबर २०१९ रोजी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ , अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय  शालेय १४ वर्षेखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेमध्ये पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करताना वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली-धोंडेवाडी ता. पंढरपूर या प्रशालेतील कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या खेळाडूंनी व्दितीय क्रमांक मिळल्याबद्ल व  कु.शिवानी पांडुरंग येड्रावकर हीची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल  श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन मा कल्याणराव काळे यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.  

यावेळी संस्थेचे सचिव मा. बाळासाहेब काळे गुरुजी , संचालिका सौ. संगीताताई काळे, कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष मा. समाधानदादा काळे , प्राचार्य मा.एच्. आर्. जमदाडे , सर्व संस्थेचे संचालक  , वसंतराव काळे  शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक  व शिक्षकेत्तर कर्मचारी , पंढरपूर तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक व मिञपरीवार , पंढरपूर तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या ..

यशस्वी खेळाडूंना राज्य क्रीडामार्गदर्शक आदरनीय सत्येन जाधव साहेब ( सोलापूर ) , क्रीडाशिक्षक प्रा. संतोष पाटील सर , प्रशिक्षक मा. अतुल जाधव सर, यांचे मार्गदर्शन लाभले.... 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close