राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ला : वास्तव की बनाव ?
नवनाथ झोळ व हर्षवर्धन झोळ यांची चौकशी करून सुटका
भाजप नेते रामदास झोळ यांच्या दत्तकला शिक्षण संस्थेच्या वादातूनच गुंतवण्याचा प्रयत्न
पोलीस खात्यासह सर्वत्र उलटसुलट चर्चांना उधाण; अधिकृत तपासातूनच सत्य समोर येणार !
बारामती, पुणे (कटूसत्य वृत्त):- उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ल्याच्या घटनेने बारामती परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाभोवती आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. हा हल्ला नेमका कसा झाला की करवून घेतला त्यामागील कारण काय आणि घटनेशी संबंधित सर्व बाबींची पोलिसांकडून कितपत पडताळणी करण्यात आली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुणे, बारामती पोलीसांनी राणा सूर्यवंशी यांचा मागील ४ ते ५ वर्षांपासून असलेला चालक ज्ञानदेव शिंदे यांनी हल्लेखोरांना पैसे देऊन हा हल्ला घडवून आणल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाल्याचे सांगितले आहे. दि.१९/१०/२०२६ रोजी पोलीसांनी नवनाथ झोळ यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केल्याचे पत्र देऊन ताब्यात घेतले व हर्षवर्धन झोळ यांना कोल्हापूरातून अटक केली. अटक करताना पोलिसांनी झोळ यांना असे सांगितले की, ज्ञानदेव शिंदेनी तुमची नावे घेतलेली आहेत. तुम्ही त्या हल्लेखोरांना पैसे देताना राणा सुर्यवंशी यांचा चालक ज्ञानदेव शिंदेनी स्वतः पाहिले आहे, असे सांगितल्यामुळे तुम्हाला अटक करीत आहोत. मात्र पोलिसांनी ज्ञानदेव शिंदेला पोलीस खाकी दाखवल्याने व पुन्हा योग्य तपास केल्याने ज्ञानदेव शिंदेनीच हल्लेखोरांना पैसे दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे झोळ पिता पुत्रांची रात्रभर चौकशी करून सकाळी सोडून दिले. त्यामुळे राणा सुर्यवंशी यांनी झोळ कुटुंबियांना खोट्या केसेसमध्ये गुंतवण्यासाठीच या हल्ल्याचा बनाव केल्याचे झोळ कुटुंबियांनी वाटते. मात्र पोलिसांनी आता त्या दिशेने निःपक्षपाती चौकशी करून दुध का दुध आणि पाणी का पाणी करावे अशी मागणी कायदा तज्ञांकडून जोर धरत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना झोळ कुटुंबियांनी सांगितले की, झोळ कुटुंबियांची भिगवन परीसरात असलेली दत्तकला शिक्षण संस्था हडप करण्याच्या हेतूने व उद्देशानेच माजी विश्वस्त राणा सूर्यवंशी हा मागील काही महिन्यांपासून झोळ कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून मानसिक आणि आर्थिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप करत या हल्ल्यात ही गुंतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे झोळ कुटुंबियांनी सांगितले. तसेच राणा सुर्यवंशी यांनी झोळ कुटुंबियांना व त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून संपवण्याच्या व गुंतवण्याच्या दिलेल्या धमक्यांची तक्रार गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केलेली आहे. त्या तक्रारीची पोलीसांनी दखल घेऊन राणा सुर्यवंशी यांच्या वर कारवाई करुन झोळ कुटुंबियांना योग्य ते संरक्षण द्यावे अशी हात जोडून विनंती झोळ कुटुंबियांनी केली आहे.
रामदास झोळ यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या भावाला व पुतण्याला आणि रामदास झोळ यांना जामीन होवू नये म्हणूनच राणा सुर्यवंशी यांनीच हा हल्ला घडवून आणला आहे का असा प्रश्न करमाळा व भिगवन तालुक्यातील नागरिकांकडून विचारला जात आहे. हल्ल्याची सत्यता, त्यामागील पार्श्वभूमी आणि विविध व्यक्तींच्या भूमिकेबाबत अधिकृत तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.
Y+ सुरक्षा भेदली कशी? हल्ला की सुरक्षेतील कसूर?
राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ल्याची फिर्याद आणि समोर येणारी वस्तुस्थिती यांत विसंगती असल्याचा संशय व्यक्त होत आहे. Y+ सुरक्षा असतानाही हल्ला झाला कसा? सुरक्षा यंत्रणेकडून कर्तव्यात कसूर झाली की घटनेमागे वेगळेच वास्तव आहे? या प्रश्नांची उत्तरे केवळ निष्पक्ष आणि सखोल तपासातूनच मिळू शकतात. त्यामुळे प्रकरणाचा तपास स्वतंत्र केंद्रीय यंत्रणेकडे (CBI) सोपविण्याची मागणी होत असून, उपलब्ध पुरावे व परिस्थितीची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे. हल्ला खरा की बनाव, याचा निर्णय आरोपांवर नव्हे, तर ठोस पुराव्यांवरच व्हायला हवा!
हल्ल्याच्या घटनेभोवती प्रश्नांचे वलय !
उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्यावर सत्तूरने वार करण्यात आल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, सूर्यवंशी यांना राज्य शासनाकडून स्टेनगनधारी ५ ते १० पोलीस संरक्षण असतानाही एक दोघे जण सत्तूरने हल्ला करु शकतील ? आणि ते हल्लेखोर पळून जावू शकतील का ? हल्लेखोर सापडण्या अगोदर झोळ पिता पुत्रांना पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी का केली ? झोळ पिता पुत्रांची चौकशी सुर्यवंशी यांच्या सांगण्यावरूनच केली का ? हल्लेखोरांनी तीच हल्ल्याची जागा का निवडली ? हल्लेखोर सुर्यवंशी यांच्या किती दिवसांपासून पाळतीवर होते. राणा सुर्यवंशी व त्यांचा चालक ज्ञानदेव शिंदे याच्यात कधी आणि किती वेळा कशा कशा वरुन वाद झाले होते का ? राणा सुर्यवंशी यांनी त्यांचे चालक ज्ञानदेव शिंदे याला कामावरून काढून टाकले आहे का ? कामावरून काढले असेल तर कधी व कश्या वरुन काढले. अशा एक नाही अनेक प्रश्नांची चौकशी होणे आवश्यक आहे. या यांत्रिक युगात पोलीसांनी हल्लेखोरांचे, शिंदेचे, सुर्यवंशी व झोळ कुटुंबियांचे फोन काॅल रेकाॅर्डची तपासणी करून सेटालाईट द्वारे लोकेशन तपासणी केली आहे का ? अतिशय महत्त्वाचं म्हणजे सुर्यवंशी यांनी झोळ कुटुंबियांना व त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून संपवण्याच्या व गुंतवण्याच्या दिलेल्या धमक्यांची पोलीस दखल घेऊन सुर्यवंशी वर कारवाई करणार का ? पोलीस संरक्षणातील पोलीस या हल्ल्यात सामील असतील तर त्यांच्या वर कारवाई केली जाईल का ? पोलीस संरक्षण घेऊन सर्व सामान्यांना धमकावून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलीस संरक्षण काढून घेतले जाणार का ? या हल्ल्याने पोलीस व सरकारची प्रतिमा मलीन झाल्याने या कटात कोण कोण सामील होते यासह सर्व प्रकारची चौकशी करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
तसेच सुर्यवंशी हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा वापर करून संस्थेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ल्याची घटना, झोळ कुटुंबियांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याने तिचा तपास सर्व बाजूंनी होणे गरजेचे आहे. घटनेच्या वेळी नेमके काय घडले आणि घटनास्थळी उपलब्ध असलेले पुरावे काय सांगतात, या प्रश्नांची उत्तरे तपासातून मिळणे महत्त्वाचे आहे. घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्या, तरी चर्चांना पुराव्यांचा पर्याय मानता येणार नाही. एखाद्या घटनेबाबत संशय व्यक्त होणे आणि त्या संशयाला पुष्टी देणारे पुरावे उपलब्ध असणे, यात मोठा फरक आहे. त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी पोलिसांनी योग्य तो तपास करून पुरावे समोर आणणे आवश्यक आहे.
झोळ पिता-पुत्रांची चौकशी; पुढे काय ?
दरम्यान, दत्तकला शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा तथा भाजप नेते रामदास झोळ यांचे बंधू नवनाथ झोळ व पुतण्या हर्षवर्धन झोळ यांना बारामती पोलिसांनी चौकशीनंतर सोडले म्हणजे संबंधित व्यक्तींना क्लीन चिट मिळाली, असे आपोआप म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे केवळ चौकशी झाली म्हणून त्यांच्यावर संशय घेऊन आरोप करणेही योग्य नाही. कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक बाबीची पडताळणी करणे आणि पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे, हीच तपासाची योग्य दिशा ठरू शकते.
पोलीस खात्यातील चर्चांपेक्षा अधिकृत खुलासा महत्त्वाचा !
या प्रकरणाबाबत पोलीस खात्यासह विविध स्तरांवर उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चर्चांना अधिकृत पुष्टी नसल्यास त्यांना अंतिम सत्य मानता येणार नाही. प्रकरणातील संभ्रम दूर करण्यासाठी पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने कायदेशीर मर्यादेत उपलब्ध माहिती स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे आणि आवश्यक असल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार कॉल डिटेल रेकॉर्डची पडताळणी यांसारख्या बाबी तपासासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. या सर्व बाबींची प्रत्यक्ष पडताळणी झाली आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने कोणताही ठाम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.
या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कथित हल्ल्याची घटना नेमकी कशी घडली आणि त्यासंबंधीच्या चर्चांमागे तथ्य काय आहे ? मात्र, हा हल्ला बनावट असल्याची चर्चा समाज माध्यम, सुजाण नागरिक व कायदा तज्ञांकडून जोरात सुरू आहे.
जर घटनेबाबत कोणतेही परस्परविरोधी दावे समोर आले असतील, तर त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करून सत्य समोर आणणे पोलिसांची जबाबदारी आहे. तसेच हल्ला प्रत्यक्ष घडला असल्यास त्यामागील सूत्रधार आणि संबंधित आरोपींचा शोध घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
निष्पक्ष तपासातूनच संशयाचे धुके दूर होणार !
राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ला प्रकरणात कोणाचाही दबाव न घेता निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे. हल्ल्याची सत्यता, घटनेमागील कारणे, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत स्पष्टता आली, तरच सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो.
या प्रकरणात केवळ कोणाची चौकशी झाली आणि कोणाला सोडून दिले, एवढाच मुद्दा नाही; तर नेमके काय घडले, याचे सत्य जनतेसमोर येणे महत्त्वाचे आहे. आरोपांच्या आधारे कोणालाही दोषी ठरवणे चुकीचे; पण गंभीर घटनेबाबत अनुत्तरित प्रश्नांकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. त्यामुळे बारामती पोलिसांच्या अधिकृत भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ला हा बनाव होता, याचे उत्तर चर्चांमधून नव्हे, तर निष्पक्ष तपास आणि ठोस पुराव्यांतूनच मिळणार आहे. याबाबत तपास चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले तर राणा सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते आता रुग्णालयात असल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

.jpeg)

No comments:
Post a Comment