जिल्हा कौशल्य स्पर्धेत सहभागाचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 10, 2019

जिल्हा कौशल्य स्पर्धेत सहभागाचे आवाहन

















जिल्हा कौशल्य स्पर्धेत
सहभागाचे आवाहन
               सोलापूर, दि. 10:- चीनमधील शांधाय येथे सन 2021 मध्ये होणान्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी  होण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन 1 जानेवारी 2020 ते 15  फेब्रुवारी 2020  कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी होणार आहे.
              स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 1999 नंतरचा असणे आवश्यक आहे. एअरक्राफट मेंटेनन्स, इन्फमेशन नेटवर्क केबलिंग, मॅन्युफॅक्चरिंग  टीम चॅलेंज, वॉटर टेक्नोलोजी, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि सायबर सिक्युरिटी  क्षेत्राकरीता उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 1996 नंतरचा असणे अनिवार्य आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://worldskillsindia.co.in या वेबसाईटवर नावनोंदणी करावी.
स्पर्धेसाठी आयटीआय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, तंत्रशिक्षण हायस्कूल, एमसीव्हीसी, बायफोकल, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, शास्त्र शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, राज्य कोशल्य विकास सोसायटीच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या व्यावसाय प्रशिक्षण संस्थामध्ये शिकत असलेल्या विद्याथ्यांनाही सहभागी होता येणार आहे. 
             अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 8/9 रविवार पेठ, पदमशाली भवन,मद्दा मंगल कार्यालय समोर कन्ना चौक सोलापर. येथे संपर्क किंवा दूरध्वनी क्र.0217/2622113/2722116 वर संपर्क साधावा, असे सहाय्यक संचालक सचिन जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages