विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून संशोधनाची दृष्टी मिळते - सी. बी. नाडगौडा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 22, 2019

विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून संशोधनाची दृष्टी मिळते - सी. बी. नाडगौडा

विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून संशोधनाची दृष्टी मिळते - सी. बी. नाडगौडा
  
संगमेश्वरच्या हर्षाली टोणपे, समीक्षा माने यांचे विज्ञान प्रकल्प प्रथम ,तर वॉलचंदच्या दर्शन गांधी, अरिहंत अगरखेड यांचे द्वितीय


                 सोलापूर ( दिनांक २१ ) "विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांचं सादरीकरण कौशल्य मिळवता येतं. मिळवलेल्या ज्ञानाला खऱ्या अर्थाने वापरता येतं. त्यातूनच नावीन्यपूर्ण मॉडेल्स विद्यार्थी बनवतात. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रकटीकरण विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून होते. असे उपक्रम कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर झाले तर विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल.कॉलेजचे हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे . विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून संशोधनाची दृष्टी मिळते. असे सी. बी. नाडगौडा म्हणाले.ते संगमेश्वर कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. मंचावर कॉलेजच्या संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य पुष्पराज काडादी, प्राचार्य डॉक्टर शोभा राजमान्य,उपप्रचार्य श्रीनिवास गोटे , उपप्राचार्य आनंद हुली , पर्यवेक्षक प्रसाद कुंटे,विज्ञान विभाग प्रमुख प्रमोद उडगीकर आदी  मान्यवर उपस्थित होते.
                                 सुरुवातीला  प्रास्ताविक एम. आर. वाली यांनी केले तर आर. एफ. डोंगरे यांनी पाहुण्यांची ओळख करून  दिली. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.परीक्षकांच्या वतीने प्राध्यापक धनंजय शहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी या प्रदर्शनातील वेगवेगळ्या प्रकल्पांचा आढावा घेत विद्यार्थ्यां मधली शोधक वृत्ती आम्हाला प्रेरित करून गेली असे प्रामाणिकपणे नमूद केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यवस्थापन समिती सदस्य पुष्पराज काडादी यांनी कॉलेजने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे महत्त्व सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानत त्यांना प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या.
निकाल
                 हर्षाली टोणपे, समीक्षा माने (प्रकल्प - स्मार्ट डस्टबिन-  प्रथम क्रमांक - संगमेश्वर कॉलेज ),
 दर्शन गांधी, अरिहंत अगरखेड (प्रकल्प -ऑब्स्टॅकल अव्हान्डिंग रोबोट  - द्वितीय क्रमांक -  वालचंद कॉलेज), शिवम शहापुरे ,अथर्व भूटे ( प्रकल्प - ऑइल स्पिल प्रिव्हेनटेशन - तृतीय क्रमांक - ए . डी. जोशी जुनियर कॉलेज),उत्तेजनार्थ बक्षिसे - राजश्री चाटी, साक्षी अथणीकर ( रिफ्लेक्शन ऑफ साउंड वेव्ह - संगमेश्वर कॉलेज)  रोशन मेरगू ,आदर्श माला ( एच टू गन - कुचन ज्युनिअर कॉलेज)  किरण भरले, चैतन्य तुपारे( पायथागोरस थेरम - संगमेश्वर कॉलेज)  मेघा सुरवसे, तुकाराम शिव शेट्टी, अनिकेत फताटे( अपार्टमेंट फार्मिंग  -संगमेश्वर कॉलेज)  भाऊसाहेब गोरंटी, ऋषिकेश कुलकर्णी ( सेरिकल्चर-  वालचंद कॉलेज) रश्मी मोहोळकर, अभिषेक बंडा ( डोमेस्टिक वेस्ट ट्रीटमेंट प्लांट- वालचंद कॉलेज) मंदार  मंद्रुपकर,अथर्व जाधव, साईनाथ तानवडे ,श्री उंडाळे( हिट सेन्सर विथ कूलिंग  - संगमेश्वर कॉलेज) साक्षी चिंचोळकर,प्रेरणा जाधव (बिलिंग ॲप्लिकेशन - संगमेश्वर कॉलेज)  वैभव कुलकर्णी, विघ्नेश येमूल  (ऑटोमॅटिक पंचिंग मार्किंग मशीन - नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय)
                          परीक्षक म्हणून प्रा.धनंजय शहा, दत्तकुमार म्हमाणे, एम. आय. बेळे, आय .आय.मुजावर, व्ही. आर.व्हटकर,  एम. एम.अडवानकर  यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना खमितकर यांनी केले तर आभार रुपाली अंबुलगे यांनी मानले.  या प्रसंगी प्रा. रामभाऊ राठोड, नागेश कोल्हे, सुभाष पाटील, बी. एम. कापसे,आर. पी कुलकर्णी, एस. पी. कुलकर्णी,एस. एन. विजापुरे, प्रशांत पाटील ,अभिजित निवर्गीकर, प्रियांका पाटील,शिल्पा लब्बा,स्मिता शिंदे , प्राजक्ता चव्हाण, सुषमा पाटील,  बाबुराव रणे ,चंद्रकांत हिरतोट, प्रशांत शिंपी ,विश्वजित आहेरकर,एस. बी. निंबर्गी,शिवराज पाटील, संतोष पवार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी , स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages