बार्शीत भारतीय नागरीकत्व संशोधन कायदयास एमआयएम चा विरोध
बार्शी प्रतिनिधी -
बार्शीत NRC आणि CAB या भारतीय नागरीकत्व संशोधन कायदा या संसदीय बिलाच्या विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने तहसीलदार प्रदीप शेलार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी एमआयएम चे शहराध्यक्ष रियाज शेेख यांनी हा कायदा त्वरीत रद्द करण्यात यावा अन्यथा लवकरच एमआयएम पक्षाच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले.यावेळी वसीम मुलाणी,कौसर शेख,शोएब सय्यद,सद्दाम शेख,तनवीर शेख आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment