खंडोबाचीवाडी येथील युवकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश
खंडोबाचीवाडी गावामध्ये फूट पाडणाऱ्या स्वार्थी पुढाऱ्यांना मोठी चपराक - राजन पाटील
मोहोळ प्रतिनिधी - विधानसभा निवडणूक २०१९ च्यावेळी तालुक्यातील शिवसेनेच्या काही पुढाऱ्यांनी खंडोबाचीवाडी येथिल काही युवकांना आम्ही पाणी आणतो तुम्ही शिवसेनेचे काम करा असे आमिष दाखवून गावामध्ये शिवसेनेची शाखा काढण्यास भाग पाडून गावामध्ये फूट पाडली परंतु विधानसभा निकालानंतर सत्ता येऊन सुद्धा एकही पुढारी पाण्या संदर्भात बोलायलाही तयार नाही हे येथील युवकांच्या लक्षात आल्यानंतर खंडोबाचीवाडी येथील शिवसेनेची शाखा बरखास्त करत पुन्हा राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एकत्र काम करणार असल्याचे प्रविण शिंदे यांनी सांगितले
राजन पाटील म्हणाले की तालुक्यातील काही मतलबी स्वार्थी पुढार्यांनी खंडोबाचीवाडी येथील तरुणांना चुकीचा मार्ग दाखवुन गावामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला परंतु त्या गावातील तरूणांनाच्या लक्षात आले की हे पुढारी खोटे स्वार्थी आहेत त्यांच्या नादी लागून गावाचे व स्वतःचे नुकसान होईल हे लक्ष्यात आल्या नंतर गावातील जाणकारांचा सल्ला घेऊन ग्रामदैवत खंडोबाची शपथ घेऊन हे गाव लोकनेते बाबुराव आण्णांच्या विचारांचे एक मुखी आहे व ही पंचकृषी एकत्र आहे व एकत्र राहणार आहे"
यावेळी प्रविण शिंदे, अनिल गुंड, प्रताप मुसळे, गहिनीनाथ इंगळे, रवी गुंड, किसन गुंड, अजित गुंड, राहुल नरके, संदीप गुंड, विकास चौधरी, सागर शिंदे,धनाजी नरके, सर्जेराव इंगळे,भगवंत गुंड, किरण मुळे, दादासाहेब शिंदे इत्यादी कार्यकर्त्यांनी खंडोबाचीवाडी चे उपसरपंच अगतराव रंगनाथ गुंड यांच्या नेतृत्वाखाली खाली अनगर ग्रामपंचायत येथे जाऊन माजी आमदार राजन पाटील आणि लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत शिवसेनेला जबरदस्त धक्का दिला आहे

No comments:
Post a Comment