*टेंभुर्णी जवळ -सोलापूर-पुणे महामार्गावर दुचाकीच्या भीषण
अपघातात दोघे जागीच ठार तर तिसरा गंभीर जखमी*
*मयत व जखमी तिघे तरुण लातूर जिल्ह्यातील औसा येथील रहिवाशी*
टेंभुर्णी ( प्रतिनिधी ) पुणे-सोलापूर महामार्गावर गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस उडविल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले असून तिसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात टेंभुर्णी जवळ शनि शिराळ (टें) गावाच्या हद्दीत सोलापुर-पुणे महामार्गावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.मयत व जखमी हे लातूर जिल्ह्यातील औसा येथील रहिवासी असून ते दिवाळी करुण परत कामाला पुण्याकडे दुचाकीवरून निघाले होते.
आकाश धोंडीराम हरणे (वय-२२ वर्षे),तन्वीर फय्युब पटेल (वय-१८) दोघे रा.औसा जि.लातूर अशी मयत तरुणांची नावे असून अल्ताफ वसीम वस्ताद (वय-२०) रा.औसा हा जखमी झाला आहे.याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,शुक्रवारी पहाटे चार वा. सुमारास टेंभुर्णी पासून सहा कि. मी.अंतरावरील शिराळ (टें) गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रिपलसीट हिरो शाईन (क्र-एम.एच.२४- बी.ए-५२४१) या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीवरील आकाश धोंडीराम हरणे व तन्वीर फय्युब पटेल हे दोघे जागीच मयत झाले आहेत.तर तिसरा अल्ताफ वसीम वस्ताद हा गंभीर जखमी झाला.गंभीर जखमीस इंदापूर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.तसेच मयत दोघांचे पार्थिव टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून तेथे शवविच्छेदन करण्यात आले.दरम्यान दोघे जागीच ठार झाल्याने व तिसरा गंभीर जखमी असल्याने तिघांचीही ओळख पटविणे पोलिसांना कठीण झाले होते.सकाळी त्यांच्या मोबाईलवर नातेवाईकांनी केलेल्या कॉलमुळे ते तिघे लातूर जिल्ह्यातील औसा येथील रहिवासी असल्याचे व ते रात्री सोलापूर मार्गे पुणे येथे निघाले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.त्यांचे नातेवाईक टेंभुर्णी येथे आल्यानंतर मयतांची ओळख पटविण्यात आली.या अपघाताची प्रदिप कांबळे यांनी खबर दिली आसुन याआपघाताची नोंद अज्ञान वाहणावर गुन्हा दाखल झाला आहे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात त नोंद झाली असुन पुढील तपास पो.नि. राजेंद्र केंद्रे साहेब करीत आहेत
No comments:
Post a Comment