युवासेनेच्या आंदोलनाला यश ;
एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलकांना लेखी उत्तर देण्याचे दिले आदेश
अकलूज (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या सर्वच संबधित अधिकाऱ्यांनी एसटी आगारात सामाजिक पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तींना सहकार्य करावे असा अधिनियम आहे. तरीसुद्धा गोरगरीबांसाठी अकलूज शहर युवासेनेने उभारलेल्या मायेची सावली (भिंत) या उपक्रमास अकलूज आगार व्यवस्थापकांनी कडाडून विरोध करून बहुजन हिताय बहुजन सुखाय या एसटी महामंडळाच्या तत्वाला काळीमा फासण्याचे काम केल्याने त्यांच्यावर कार्यवाही होण्यासाठी युवासेनेने दि. २५/११/२०१९ रोजी अकलूज येथील प्रांत कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेऊन प्रांताधिकारी शमा पवार यांनी एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
अकलूज आगार व्यवस्थापकाची मुजोरी पाहून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आगारात येऊन आगारव्यस्थापकांची माहिती घेतल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकरणे कानावर आली. त्यामुळे युवासेनेच्या मायेची सावली या उपक्रमास कडाडून विरोध करणाऱ्या आगार व्यवस्थापकावर कार्यवाही होण्याबरोबरच एसटी कामगार बोबडे यांना आगार व्यवस्थापकांच्या अॉफिसमध्ये मारहाण करणारे आगारव्यवस्थापक तानाजी पवार व उदय दुपडे यांनी लेखी स्वरूपात माफी मागावी अशी मागणी युवासैनिकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे लावून धरली होती. त्यामुळे प्रांताधिकारी शमा पवार मॅडम यांनी तातडीने या आंदोलनाची दखल घेऊन एसटी महामंडळाचे कर्मचारी उदय दुपडे यांना समक्ष बोलावून याबाबत जाब विचारला. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलकांना लेखी स्वरूपाचे उत्तर देण्याचा त्यांना आदेश दिला. अशाप्रकारे युवासेनेच्या आंदोलनाला यश आले असून यापुढे माळशिरस तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती युवासेनेच्या वतीने विशेष लक्ष ठेवून गोरगरीबांना न्याय मिळवून दिला जाईल असे याप्रसंगी बोलताना शेखर(भैय्या) खिलारे म्हणाले. यावेळी प्रहारचे किरण भांगे, जावेद बागवान(ग्रामपंचायत सदस्य अकलुज), अविनाश सोनवणे, तुषार जाधव, ओमकार राजमाने, चेतन ख़िलारे यांच्यासह अनेक युवासैनिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment