पत्रलेखन स्पर्धेत नाझरा विद्यामंदिरचा सहभाग - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 30, 2019

पत्रलेखन स्पर्धेत नाझरा विद्यामंदिरचा सहभाग

पत्रलेखन स्पर्धेत नाझरा विद्यामंदिरचा सहभाग
नाझरा (वार्ताहर):- तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून भारतीय पोस्ट कार्यालयाच्या वतीने संपूर्ण देशभर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. "बापू तुम्ही अमर आहात" या विषयावर पत्र लेखन स्पर्धा असून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर मोठी पारितोषिक या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत. नाझरा येथील पोस्ट ऑफिस च्या वतीने केलेल्या आवाहनानुसार नाझरा विद्यामंदिर मधील ७० स्पर्धकांनी या पत्रलेखन स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.हे पत्र लिहून मुंबई येथील मुख्य कार्यालयात पाठवले जाणार आहे.महात्मा गांधीजी आजही त्यांच्या विचारांच्या माध्यमातून या देशात कसे अमर आहेत व  त्यांनी केलेले कार्य हे कसे अमर आहे.या विषयावर पत्र लेखनासाठी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त  प्रतिसाद दिला. सदर पत्र लेखन स्पर्धा प्राचार्य नारायण विसापूरे,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे ,पोस्ट ऑफिस चे निरीक्षक सोमनाथ गायकवाड साहेब, नाझरा येथील पोस्टमास्टर हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी बोलताना पोस्टमास्तर हाके साहेब म्हणाले की,  सतत मोबाईलच्या  संपर्कात असणाऱ्या या मुलांना  पत्र लेखनाची आवड निर्माण व्हावी, पत्र कसे पाठवले जाते,  ते कशा पद्धतीने पोहोचते याची माहिती व्हावी व महात्मा गांधीजींचा विचार मुलांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ही स्पर्धा राबवण्यात आली आहे.सदर स्पर्धा यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रशालेतील सहशिक्षक सुनील जवंजाळ यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages