काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष धर्मा भोसले यांचे निधन : शनिवारी होणार अंत्यसंस्कार
सोलापूर - काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष धर्मा रामकृष्ण भोसले यांचे शुक्रवार ११ ऑक्टोबर मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते.मृत्यूसमयी ते ५९ वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी सकाळी १० वाजता नरसिंग गिरजी मिल चाळीतील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून बाळे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,एक बहीण,पत्नी,दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
धर्मा भोसले हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडीचे.२४ जुलै १९६० रोजी सोलापुरात त्यांचा जन्म झाला. नरसिंग गिरजी मिलमध्ये ते कामाला होते.कामगारांच्या चाळीतच ते रहावयास होते.१२ वी शिक्षण झालेले धर्मा भोसले यांच्या राजकारणाची सुरुवात एन.एस.यू. आय . मधून झाली.पुढे त्यांनी युवक काँग्रेस, सेवादल आणि शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूषविले.तब्बल १३ वर्षे ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. १९९२ ते १९९७ या कालावधीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले.त्यांनतर म्हणजेच १९९७ ते २००२ पर्यंत स्वीकृत सदस्य होते.याशिवाय महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे ते सदस्यही होते. अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असलेले धर्मा भोसले यांना राज्य कार्यकारिणीवरसुद्धा घेण्यात आले होते.१३ वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असताना त्यांनी पक्ष घराघरात पोहोचविला.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ते कट्टर समर्थक होते. लोकसभा आणि विधानसभा तसेच महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही. सुशीलकुमार शिंदे यांच्या वाटचालीत त्यांचे महत्वाचे योगदान होते. केवळ काँग्रेसच नव्हे तर सर्वपक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या निधनाने सोलापूरकर हळहळ व्यक्त करत आहेत.

No comments:
Post a Comment