बार्शी कुर्डुवाडी रोडवर एसटी मालट्रक अपघातात २ ठार ,१ गंभीर तर ६ जखमी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 27, 2019

बार्शी कुर्डुवाडी रोडवर एसटी मालट्रक अपघातात २ ठार ,१ गंभीर तर ६ जखमी


बार्शी कुर्डुवाडी रोडवर एसटी मालट्रक अपघातात २ ठार ,१ गंभीर तर ६ जखमी 

बार्शी - कुर्डवाडी रस्त्यावरील हॉटेल पराग समोर उभ्या असलेल्या मालट्रकाला (क्रमांक MH17 BD7724) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MH20BL 3821) बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात लातुर जिल्ह्यातील बस चालकासह अन्य एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. आज (ता.27) पहाटे 4.45 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या अपघातात 2 ठार 1 गंभीर व सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.चालक सुधाकर होळकर (रा.लातूर) व दिनेश कुमुटवार (रा.केज ) अशी अपघातात ठार झाल्‍यांची नावे आहेत. हरिराम निवृत्ती मेटकरी (रा.धानोरा, लातुर), सुनील ज्ञानेश्वर जाधव (रा.धोत्रे ता.बार्शी), जब्बार रसूल तांबोळी (रा.येरमाळा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद), अशोक राम नंदनवार (रा.हलकी लातूर), सुशांत चंद्रकांत मनसरे (रा.भिसे वाघोली), दिलिपकुमार रघुनाथ कांबळे (रा.चाकुर व भास्कर), वैजिनाथ गाढवे (रा. वरूडा, ता.जि.उस्मानाबाद) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सपोनी राहूल देशपांडे, सहा पोलिस उपनिरिक्षक दिनेश कुंभार, हवालदार राजेंद्र मंगरुळे, सचिन माने, योगेश मंडलिक, धनराज फत्तेपुरे, माधव धुमाळ यांनी भेट देवून जखमींना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages