भीमा हा शेतकरी व कामगारांचा राजवाडा आहे त्यास धक्का पोहोचु देणार नाही: प्रभाकर देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 26, 2019

भीमा हा शेतकरी व कामगारांचा राजवाडा आहे त्यास धक्का पोहोचु देणार नाही: प्रभाकर देशमुख

भीमा हा शेतकरी व कामगारांचा राजवाडा आहे त्यास धक्का पोहोचु देणार नाही: प्रभाकर देशमुख..

मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखाना विद्यमान संचालक तसेच महाराष्ट्र राज्य जन हे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी विविध मागण्यासाठी भीमा कारखाना स्थळावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
कारखाण्याचे चेअरमन धनंजय महाडीक यांना सुबुध्दी देऊन आंदोलन कर्ते यांना भेट द्यावी यासाठी कारखाण्याचे गेटसमोर आज भजन कीर्तन करुन विठ्ठलास साकडे घातले व कामगार ऊस उत्पादक शेतकरी तसेच जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनास बसले असुन आजचा तीसरा दिवस आहे व जोपर्यंत मागण्या माण्य करत नाहीत तोवर आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी सांगीतले तसेच कर्मचाऱ्यांच्या देयक मिळाल्याच पाहिजेत तसेच सन 2017 ला गाळपास आलेल्या उसाचे बिल 150 रुपये मिळालेच पाहिजे तसेच 2018 19 लागत असलेल्या ऊसाच्या एफआरपी मिळाली पाहिजे यावेळी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले हा कारखाना शेतकऱ्यांचा राजवाडा आहे तो उध्वस्त होता कामा नये कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांना मी राजकारणात सहकार्य केले व ते यापुढेही राहील मात्र न्यायासाठी हे आंदोलन सुरू केले आहे मागील दीडशे रुपये या सालची एफआरपी असे सतरा कोटी व कामगारांचे पगार मिळून साडे सोळा कोटी रुपये रक्कम येणे बाकी आहे कामगारांचा 15 महिन्याचा पगार झालेला नाही निवृत्त कर्मचाऱ्यांचे देव रत्न दिल्या गेल्या नाहीत त्यामुळे अनेकांचे प्रपंच उध्वस्त होत आहेत शेतकरी व कर्मचाऱ्यांची मुले हुशार असून देखील उच्च शिक्षण घेता येत नाही असे देशमुख म्हणाले.यावेळी संस्थापक प्रभाकर देशमुख ,माजी संचालक रतीलाल गावडे, आंबादास बाबर यांनीही उपस्थिती दर्शविली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages