Hot Posts

6/recent/ticker-posts

रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप 

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने इंडियन शुगर मिल असोशियनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा परिसर आजोती येथे वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

या बाबत अधिक माहिती देताना प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले कि, रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करताना निसर्गसंवर्धन महत्वाचे समजून वृक्षारोपणाचा हा उपक्रम राबिवला आहे. केवळ वृक्षलागवड करूनच आम्ही थांबणार नसून या वृक्षाची जोपासना करण्यासाठीही विशेष प्रयत्न करणार आहे.

यावेळी आजोती गावचे सरपंच सचिन धेंडंगे,व्होळेचे उपसरपंच सिद्धू बंडगर,ग्रामपंचायत सदस्य विजय आरकिले,विलास कवडे,मनोज पवार बालाजी खंदारे,सोमा थाटकर,राजू गुटाळ,गणेश गावडे,सोमा ढवण,विकास घोलप यांच्यासह शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments