अक्कलकोट विधानसभेचे काँग्रेसचे प्रबळ दावेदार अँड. संतोष पाटील (दुधनी) यांनी मंगळवारच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
अक्कलकोट तालुक्यातील दूधनीचे रहिवाशी असलेले अॅड.संतोष पाटील हे आ. म्हेत्रें घराण्याचे कट्टर विरोधक आहेत. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेस पक्षाकडून अॅड.संतोष पाटील यांनी निवडणूक लढवणार आहे.
नुकतेच आमदार प्रणिती शिंदे यांनी अँड. संतोष पाटील (दुधनी) यांच्याबरोबर अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घडामोडींवर संपूर्ण चर्चा करून त्यांना पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
जनतेचा कौल घेण्यासाठी अँड. पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील दुधनी, मैंदर्गी, सलगर, वागदारी, तडवळ व विविध ग्रामीण भागाचा दौरा केली आहेत..

0 Comments