Hot Posts

6/recent/ticker-posts

मोडनिंब दि. माढा बार्शी व करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचे ऑनलाईन वेतन बार्शी मे व जुलै 2019 हे दोन महिने करमाळा जून 2019 एक महिना माढा जुलै 2019 एक महीना अशा वरील महीन्याची कर्मचाऱ्यांची वेतन बिले तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांनी आपली डिजिटल सिग्नीचर ने जिल्हा परीषद सोलापुर यांचे कडे पाठविली नसलेमुळे जिल्हापरीषद सोलापुर यांनी देखील मा. प्रकल्प संचालक, राजीव गांधी सशक्तीकरण अभियान केंद्र पुणे यांचे कडे सादर केली नसल्यामुळे माढा, बार्शी, करमाळा या तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही तसेच ऑगस्ट २०१९ या महीन्याचे अप्रूवल ग्रामसेवक यांचा बेमुदत संप असेलेने ग्रामसेवक लॉगीन मधुन कर्मचाऱ्यांच्या वेतनाची माहीती भरण्यात आलेली नाही त्यामुळे दिनांक १ ते ४ ऑक्टो २०१९ रोजी पर्यंत ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्याची वेतनाची माहीती ग्रामसेवक लाँगीन मधुन भरल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणा अगोदर वेतन मिळणार कि नाही याची काळजी कर्मचाऱ्यांना वाटु लागली आहे एैन दिवाळी सणात कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ येवु नये कर्मचाऱ्यांना ऑन लाईनवेतन मिळावे अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामधुन जोर धरू लागली आहे तसेच वेतन जमा न झाल्याच्या तक्रारी माढा बार्शी व करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केल्याने ग्रामपंचायत कर्मचारी युनियन च्या वतीने मा. प्रकाश वायचळ मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद सोलापुर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ज्या तालुक्याचे वेतन थकले आहे त्यांचे वेतन तात्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे अशी माहीती प्रसिद्धी प्रमुख अरुण सुर्वे यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव कार्याध्यक्ष मोहन लामकाने सरचिरणीस महादेव माळी , रामभाऊ गरड, महादेव पारसे, बालाजी पवार खाजाभाई शेख आदी जण उपस्थीत होते
Reactions

Post a Comment

0 Comments