Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार-अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव



माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार

-अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव
सोलापूर दि. 29 :- देशाच्या सीमांचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुरक्षित आहे. देश संरक्षणासाठी अनेक सैनिकांनी आपले बलिदान दिलेले आहे. अशा सर्व सैनिकांचे कुटुंबिय वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिकाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रधान्य देणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सांगितले .जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्येशिय सभागृहात अयोजीत तिसऱ्या शौर्य दिनानिम्मित अप्पर जिल्हाधिकारी जाधव बोलत होते. यावेळी प्रकाश वायचळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजित देशमुख, निवृत्त सैनिक कल्याण संघटनेचे मेजर एस.एस. खांडेकर यांच्यासह पदाधिकारी, वीरमाता वीरपत्नी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अप्पर जिल्हाधिकारी जाधव पुढे म्हणाले सैनिकांच्या व‍िधवा माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय यांच्या समस्यांची आपल्याला जवळून जाण आहे. मी स्वस्त: सैनिक पुत्र असून माझ्या वडिलांचे 1981 मध्ये सैन्यात असताना निधन झाले होते. त्यामुळे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी सैनिक व विधवांनी त्यांच्या जिल्हा परिषदेशी संबंधित समस्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी केले.
प्रस्ताविकात मेजर खांडेकर यांनी 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसुन सर्जिकल स्ट्राईक करुन अतिरेक्यांचा खात्मा केला. ही अभिमानास्पद कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवावी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी 29 सप्टेंबर हा शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो, असे सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिक , सैनिकाच्या विधवा व त्याचे कुटुंबिय यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मानद कॅप्टन मार्तड दाभाडे यांनी केले, तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी मानले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सैनिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments