सरकारच्या गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावर डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त प्रतिक्रिया ...
राज्यातील २५ किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंग अशा पद्धतीने स्थळ विकसित करण्यात येणार आहे. अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह निर्णय आहे. सरकारला विचारावंसं वाटतं, डोकं ठिकाणावर आहे का? कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी यातला एकेक किल्ला, एकेक बुरूज, एकेक दरवाजा राखण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं त्या बलिदानाचा असा अपमान करण्याचा कोणता अधिकार सरकारला आहे? मिर्झाराजे जयसिंगाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला तेव्हा जेमतेम २० किल्ले दिले होते. औरंगजेबाला त्याच्या संपूर्ण हयातीत एकही किल्ला जिंकता आला नव्हता. पण, दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं की, जे औरंगजेबाला जमलं नाही असा निर्णय सरकारने घेऊन दाखवला.
राजस्थानचे किल्ले निवासी किल्ले, महाराष्ट्रातले किल्ले वॉर फोर्ट्स आहे, हा फरक लक्षात घेतला पाहिजे. या किल्ल्यांना डेस्टिनेशन वेडिंगची स्थळं आम्ही होऊ देणार नाही. राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.. तसेच कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. मात्र या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे.
0 Comments