ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देणार आहे.
सरकारने गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र सरकारच्या या निर्णयामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा अनेकांनी विरोध केला असून राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीका होत आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने याबाबत बातमी छापली आहे.
हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली आहे. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातील 25 किल्ले एमटीडीसी हॉटेल आणि हॉस्पिटीलिटी चेन्सना भाडेतत्वावर देणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाने 3 सप्टेंबरला मान्यता दिली आहे.
लग्न समारंभ, करमणुकीचे कार्यक्रम, डेस्टिनेशन वेडिंग यासाठी या गडकिल्ल्याचा वापर करण्यात येणार आहे. राजस्थान, गोवा या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यटनाला चालना देत वास्तू जतन केल्या जाऊ शकतात असा विश्वास पर्यटन विभागाला आहे. तसेच कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. मात्र या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे.
0 Comments