प्रणिती शिंदे यांना 9 सप्टेंबरपर्यंत अंतरीम जामीन..
शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्यासंदर्भाच्या सुनावणीला कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या गुरुवारी सोलापूर न्यायालयात हजर झाल्या. त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत अंतरीम जामीन मिळाला आहे. त्यांना न्यायालयात हजर होण्याबाबत जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले होते.
या प्रकरणात माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करीम शेख आदींना या अधीच जामीन मिळाला आहे. 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी वेळी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला होता. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली होती. या प्रकरणात कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण आणल्याचा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.
0 Comments