Hot Posts

6/recent/ticker-posts

मंडप उभारणीचे काम करताना मामाचा तोल जावून पडल्याने एक महिन्याच्या भाचीचा मृत्यू..


 मंडप उभारणीचे काम करताना मामाचा तोल जावून पडल्याने एक महिन्याच्या भाचीचा मृत्यू..
सोलापूर : घरात लक्ष्मी बसविण्यासाठी आरास तयार करताना मंडप उभारणीचे काम करणारया मामाचा तोल जावून पडल्याने एक महिन्याच्या भाचीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पूर्व भागातील अक्कलकोट एम.आय.डी.सी परिसरात घडली. या घटनेत एक महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याने पूर्व भागात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, गुरूवारी सायंकाळी गौराईचे आगमन झाले़ रात्री दहाच्या सुमारास गौराईच्या सजावटीसाठी मंडप उभारताना मामा मंडप उभारणीचे काम करीत होता़ मंडप उभारणीवेळी अचानक मामाचा तोल जाऊन खाली जमिनीवर झोपलेल्या भाचीवर पडला.

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरू असताना गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास तिचा दुदैवी अंत झाला. लक्ष्मी नारायण चव्हाण असे मयत झालेल्या चिमुरडीच्या आईचे नाव आहे. या घटनेमुळे पूर्व भागात हळहळ व्यक्त होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments