२१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला मतमोजणी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 21, 2019

२१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला मतमोजणी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर.



Image result for vidhansabha maharashtra
 २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला मतमोजणी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर.


नवी दिल्लीः महाजनादेश, जनआशीर्वाद, शिवस्वराज्य या यात्रा महाराष्ट्रभर फिरू लागल्यापासून ज्या घोषणेकडे सगळ्यांचेच कान लागले होते, ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली आहे. २०१४च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाची विधानसभा निवडणूकही एकाच टप्प्यात होणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला.

हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे. दिवाळीच्या आधीच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार

निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख - २७ सप्टेंबर २०१९

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - ४ ऑक्टोबर २०१९

उमेदवारी अर्जांची छाननी - ५ ऑक्टोबर २०१९

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत - ७ ऑक्टोबर २०१९

मतदान - २१ ऑक्टोबर २०१९

मतमोजणी - २४ ऑक्टोबर २०१९

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages