संजयमामा शिंदे यांच्या वतीने
निराधारांना फराळ आणि ब्लॅंकेट चे वाटप.
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमातील वृद्ध, निराधार, महिला व पुरुष यांना माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वतीने दिवाळी फराळ,ब्लँकेट देऊन त्यांची वृद्धांची दिवाळी सार्थक केली.
बुधवारी 4 नोव्हेंबर रोजी टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांना दीपावलीचे औचित्य साधून माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आला . तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी ब्लँकेट ही देण्यात आले.यामुळे खऱ्या अर्थाने निराधारांची दिवाळी सार्थक केली. यावेळी अकोले खुर्द तालुका माढा येथील बबनराव शिंदे विद्यालयाचे प्राचार्य , शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी पंचायत समितीचे सदस्य संभाजी पाटील , बबनराव शिंदे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे, संस्थेचे सचिव प्राचार्य जवानसिंग रजपुत , दशरथ महाडिक , कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे , पंडित पाटील , सोमनाथ महाडिक , हरिचंद्र गाडेकर , सदाशिव पवार , संभाजी अनपट , विलास पवार, वैभव खडके , साहेबराव कोळी, ज्ञानदेव दळवी , शोभा सुरवसे, मनिषा लावंड , ढवळे , माने , चव्हाण उपस्थित होते.
यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक दशरथ देशमुख, म्हणाले की,२४ वर्षापासून वृद्धांश्रम सुरू असून मुले असून ही ते वृद्धांना सांभाळत नाहीत.तसेच काहीना सांभाळणारे जवळचे कोणी नातेवाईक नसतात. व काम करता येत नाही म्हणून वृद्धाश्रमात राहावे लागते.त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही.यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या वृद्ध आईवडिलांचा विसर पडू देऊ नका.त्यांची सेवा केली पाहिजे.यावेळी धनंजय मोरे यांनी ही मनोगत व्यक्त केले

No comments:
Post a Comment