सायबर सुरक्षे बाबत जागरूक झाले पाहिजे - जसविंदर सिंह - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 5, 2026

सायबर सुरक्षे बाबत जागरूक झाले पाहिजे - जसविंदर सिंह

सायबर सुरक्षे बाबत जागरूक झाले पाहिजे - जसविंदर सिंह

पीसीयू मध्ये आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा स्पर्धा संपन्न 




पिंपरी, पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२६) सायबर सुरक्षेतील वाढते धोके आणि त्यावरील उपाययोजना बाबत जागरूक झाले पाहिजे. यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे असे क्विक हिल आणि सिक्रीट लॅबचे वरिष्ठ संचालक जसविंदर सिंह यांनी सांगितले.
     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे 'स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स' च्या वतीने ‘क्रेस्ट सीटीएफ २.०-२०२६’ ही स्पर्धा ‘हॅक टुडे अ सेफर टुमारो' या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ऑनलाइन, ऑफलाइन स्पर्धेत भारत, दुबई, पाकिस्तान, यूके, यूएसए मधील  स्पर्धेत १६०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
     पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
     विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा तज्ञ होण्यासाठी सातत्याने शिकणे, कौशल्य विकसित करणे आणि नैतिक हॅकिंगच्या माध्यमातून डिजिटल जगाच्या संरक्षणासाठी योगदान देणे महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन पीसीयूच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचे प्रमुख डॉ. कमलेश मेश्राम यांनी केले.
     यावेळी पीसीयु कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, संरक्षण प्रकल्पांचे तज्ज्ञ लेफ्टनंट कमांडर विवेक कामत, सायबर सिक्युअर्ड इंडियाचे संस्थापक निखिल महादेश्वर, पीसीयु कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, परीक्षा नियंत्रक डॉ. अंजू बाला, अमित पाटील, शैक्षणिक विभाग अधिष्ठाता डॉ. सचिन पवार, आयक्यूएसएस चे अध्यक्ष डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा, हायरॉशील्डचे संस्थापक प्रियांशु कुक्कर, हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीच्या संचालक शिफा सायकलवाला आणि संस्थापक संचालक रोहित गौतम आदी उपस्थित होते.
     लेफ्टनंट कमांडर विवेक कामत, निखिल महादेश्वर, शिफा सायकलवाला, प्रियांशु कुक्कर आणि रोहित गौतम, डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा, डॉ. सचिन पवार यांनीही मार्गदर्शन केले. 
   सीटीएफ ७ आणि थंडरसिफेर, झेड ७ सिक्युरिटी सोल्युशन्स, व्हाईटएरो, एनवायएक्स, हिरो शील्ड, सिक्युरिटी बोट आणि टीसेकफोर्ज यांचे सहकार्य मिळाले. बानुबा कोडे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages