पीसीसीओई ला "जल्लोष २०२६" स्पर्धेत तीन पारितोषिके प्राप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 5, 2026

पीसीसीओई ला "जल्लोष २०२६" स्पर्धेत तीन पारितोषिके प्राप्त

पीसीसीओई ला "जल्लोष २०२६" स्पर्धेत तीन पारितोषिके प्राप्त 

राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड



पिंपरी, पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२६) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळ आणि संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्था, कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जल्लोष २०२६’ या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने तीन पारितोषिके पटकावत उल्लेखनीय यश मिळवले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -
भारतीय शास्त्रीय गायनात प्रथम क्रमांक - सानिया मुंगारे; व्यंगचित्र स्पर्धेत द्वितीय क्रमांक - जयदीप वाकडे आणि रांगोळी स्पर्धेत तृतीय क्रमांक - चंचल वर्मा या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले. या तिन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, अधिव्याख्याते डॉ. पद्माकर देशमुख, उपअधिव्याख्याते डॉ. राजेश फुरसुले यांनी आर्ट सर्कलच्या संघाचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. मसनाजी नुकुलवार यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages