आरोग्य विभागाची प्रशासकीय जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवा- श्रीकांत शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

आरोग्य विभागाची प्रशासकीय जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवा- श्रीकांत शिंदे

 आरोग्य विभागाची प्रशासकीय जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे  सोपवा- श्रीकांत शिंदे

आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयाबद्दल चौकशीचे आदेश



पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रशासकीय कारभार अधिक सहय शिस्तबद्ध पारदर्शक व लोकाभिमुख करण्यासाठी कर्तव्यकठोर अधिकारी श्री.तुकाराम मुंढे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात यावी याबाबत आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी निवेदनावर आग्रही मागणी केली आहे. तसेच पंढरपूरचे उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध मागण्याबाबत ही निवेदन दिले असून सचिव यांच्याकडे आरोग्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
या निवेदनात असे म्हटले आहे की, 
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थिती, रुग्णांवरील उपचारातील कथित हलगर्जीपणा, शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छतेचा अभाव तसेच रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविण्याच्या प्रकारांची सखोल चौकशी करून दोर्षीवर कारवाई करण्याची मागणी केली असता आरोग्यमंत्री यांनी सचिवांना चौकशीचे आदेश दिले.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेली अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मोठ्या अपेक्षेने शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येत असतात. मात्र अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती, रुग्णसेवेतील दिरंगाई, प्रशासकीय निष्काळजीपणा, औषधोपचारांमधील त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेतील कमतरता यामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासकीय आरोग्य यंत्रणा ही केवळ प्रशासकीय विभाग न राहता सामान्य माणसाला विश्वासाने उपचार मिळवून देणारी सक्षम व्यवस्था बनणे ही काळाची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, स्पष्टवक्तेपणा आणि कामकाजातील कार्यक्षमतेसाठी परिचित असलेले श्री. तुकाराम मुंढे साहेब यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी सोपविण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.
त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि कार्यशैलीचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजात निश्चितच उपयोग होऊ शकतो, अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या व महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने आपण आमच्या मागणीचा विचार करावा अशी विनंती श्रीकांत शिंदे यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांना केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages