आर्या दूध संस्थेचा दूध उत्पादकांना दिवाळी फराळासह पशुखाद्य पाटी व ज्वारी बियाण्यांचे वाटप! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

आर्या दूध संस्थेचा दूध उत्पादकांना दिवाळी फराळासह पशुखाद्य पाटी व ज्वारी बियाण्यांचे वाटप!

 आर्या दूध संस्थेचा दूध उत्पादकांना दिवाळी फराळासह पशुखाद्य पाटी व ज्वारी बियाण्यांचे वाटप!

बेंबळेतील दूध उत्पादन पाचपट वाढविण्याचा संकल्प; ५०० सभासदांना पशुखाद्य पाटी, तर ५० सभासदांना ज्वारी बियाण्यांचे वितरण



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-   बेंबळे (ता. माढा) येथील आर्या दूध संकलन शीतकरण केंद्राच्या वतीने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी हरीनगर येथे दूध उत्पादक सभासदांसाठी दिवाळीनिमित्त फराळ व पशुखाद्य पाटीचे वाटप करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या सहकार्याने निवडक सभासदांना ज्वारी बियाण्यांचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या जवळपास ५०० दूध उत्पादक सभासदांना पशुखाद्य पाटी, तर सुमारे ५० सभासदांना ज्वारी बियाण्यांचे वाटप करून दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. बेंबळे परिसरातील दूध उत्पादन पाचपट वाढविण्यासाठी, जनावरांचे अनुवंशिक तंत्रज्ञान सुधारणे आणि वैरण विकासाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वास मा. सभापती विक्रमदादा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात हणमंत सलगर पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी सभासद ज्योतीराम भाऊ नागटिळक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वाय. जी. भोसले सर आणि संजय पाटील यांनी दूध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, जनावरांचे योग्य व्यवस्थापन आणि दुग्धव्यवसायातून आर्थिक समृद्धी साधण्याबाबत मार्गदर्शन केले.
जनावरांची उत्तम निवड, योग्य पशुखाद्य, आर्थिक ताळमेळ आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर दूध उत्पादनात वाढ करता येते, हे आर्या दूध संस्थेच्या कामकाजातून दिसून येत आहे. संस्थेमार्फत दररोज गाईच्या दुधाचे सुमारे २२०० लिटर, तर म्हशीच्या दुधाचे सुमारे १५०० लिटर संकलन केले जाते. दूध उत्पादकांना दुधाची तपासणी करून गुणवत्तेनुसार गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४१ ते ४८ रुपये, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ५३ ते ११३ रुपये दर दिला जातो, अशी माहिती संस्थेचे चेअरमन डॉ. भीमराव पवार यांनी दिली.
दरम्यान, दूध व्यवसायातील उल्लेखनीय प्रगतीबद्दल संस्थेचे दूध उत्पादक शेतकरी संभाजी लक्ष्मण कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी एका गाईपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने गोठ्यातील गाईंची संख्या १२ पर्यंत वाढवली असून, सध्या ते दररोज सुमारे १२५ लिटर दूध उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या यशस्वी वाटचालीतून इतर दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळावी, हा या सत्कारामागील उद्देश होता.
या कार्यक्रमाला मा. सभापती विक्रमदादा शिंदे, मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील, कृषी सहाय्यक उबाळे साहेब, सातव साहेब, क्षीरसागर साहेब, वाय. जी. भोसले सर, कृषिनिष्ठ कृषिभूषण सोमनाथ हुलगे, कारखाना संचालक संजय पवार, माजी सरपंच कैलास भोसले, गळगुंडे भाऊसाहेब, माऊली पवार, दादा भोसले, दत्ता अटकळे, सुधाकर पवार, रोहन पवार, बाळासाहेब पवार, संतोष शिंदे सर, स्वप्निल भोसले, अनिल अवताडे यांच्यासह परिसरातील दूध उत्पादक शेतकरी व संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन कल्याण अनपट सर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages