अकलूज बस डेपोसाठी २० चालक व २० वाहकांची मागणी; परिवहनमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आश्वासन! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

अकलूज बस डेपोसाठी २० चालक व २० वाहकांची मागणी; परिवहनमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आश्वासन!

 अकलूज बस डेपोसाठी २० चालक व २० वाहकांची मागणी; परिवहनमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आश्वासन!

शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन



नातेपुते (कटूसत्य वृत्त):-   महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोलापूर-धाराशिव दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांनी अकलूज एसटी बस डेपोसाठी तातडीने २० चालक व २० वाहक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी परिवहनमंत्री सरनाईक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले. या मागणीची तातडीने पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिल्याने अकलूज तालुक्यातील प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
अकलूज बस डेपोअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना एसटी महामंडळाच्या माध्यमातून नियमित बससेवा पुरविण्यात येते. मात्र, सध्या डेपोमध्ये चालक व वाहकांची संख्या अपुरी असल्याने उपलब्ध बसेस नियमितपणे चालविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी अनेक बसफेऱ्यांवर परिणाम होत असून विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने अकलूज बस डेपोसाठी मागणीनुसार २० नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, या बसेस चालविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने त्यांचा अपेक्षित उपयोग होत नसल्याची बाब निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आली.
अकलूज डेपोसाठी तातडीने २० चालक व २० वाहकांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून बंद अथवा कमी झालेल्या बसफेऱ्या पुन्हा पूर्ववत सुरू करता येतील. ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत एसटीची सेवा नियमित पोहोचेल आणि विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी मागणी राजकुमार हिवरकर-पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
या मागणीची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक दखल घेत लवकरच आवश्यक कार्यवाही करून कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.चालक व वाहक उपलब्ध झाल्यास अकलूजची लालपरी पुन्हा शहरापासून ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत नियमित धावण्याचा मार्ग मोकळा होणार असून, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आ असल्याचेही राजकुमार हिवरकर पाटील यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages