टाकळीत वृद्ध महिलेच्या घरात घुसून धक्काबुक्की; जीवे मारण्याची धमकी! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

टाकळीत वृद्ध महिलेच्या घरात घुसून धक्काबुक्की; जीवे मारण्याची धमकी!

टाकळीत वृद्ध महिलेच्या घरात घुसून धक्काबुक्की; जीवे मारण्याची धमकी!

 ‘तुझी आणि तुझ्या मुलीची सुपारी घेतली आहे’ म्हणत दहशत ८ जणांसह ६ ते ७ अनोळखी महिला-पुरुषांविरुद्ध टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-    टाकळी (टें) येथे घरासमोर येऊन एका ६३ वर्षीय वृद्ध महिलेला धक्काबुक्की करत अश्लील भाषेत धमकावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ‘घरातील साहित्य बाहेर काढ, अन्यथा आम्ही बाहेर काढू’, असे म्हणत संबंधितांनी घरात प्रवेश केला. तसेच ‘तुझे गुप्तांग बाहेर काढून टाकू, आम्ही तुझी आणि तुझ्या मुलीची जीवे मारण्याची सुपारी घेतली आहे,’ अशी गंभीर धमकी दिल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आठ नामनिर्दिष्ट व्यक्तींसह सहा ते सात अनोळखी महिला व पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, रंजना लक्ष्मण भोसले (वय ६३, रा. भोसलेवस्ती, महादेवनगर, टाकळी टें., ता. माढा) या २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी एकट्याच होत्या. त्यावेळी रविंद्र ज्योती जाधव हा त्यांच्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली येऊन थांबला. त्यानंतर त्याची पत्नी सावित्री जाधव, मुलगा ज्योतीराम जाधव, मधुकर ज्योती जाधव, गणेश पुरुषोत्तम जाधव, उमेश पुरुषोत्तम जाधव, महेश सुरेश जाधव आणि सज्जन उर्फ राजेंद्र मोहन जाधव हे तेथे आले.
दरम्यान, फोर्स ट्रॅव्हलर कंपनीच्या वाहनातून काळ्या रंगाचे सफारी कपडे परिधान केलेले सहा ते सात महिला व पुरुषही तेथे आले. त्यांनी घरात प्रवेश करून घरातील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. यावर फिर्यादी महिलेने न्यायालयात केस सुरू असल्याचे सांगितले असता, संबंधितांनी त्यांना धक्काबुक्की करून अश्लील भाषेत धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार सुरू असताना फिर्यादींचा पुतण्या जयहिंद भोसले गर्दी पाहून तेथे आला. त्यालाही या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, असे सांगत बांधाच्या बाहेर जाण्यास सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पुतण्या हे दिर हनुमंत भोसले यांच्या घरी जाऊन थांबले.
काही वेळाने फिर्यादींची मुलगी सुवर्णा गायकवाड हिने फिर्यादींच्या घरासमोर थांबलेल्या लोकांचे व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर १२ ते १५ महिला व पुरुष दिराच्या घरी आले. व्हिडिओ शूटिंग करणारी पिवळ्या साडीतील महिला कुठे आहे, अशी विचारणा करत त्यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच खोट्या केसेस करण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संबंधित महिला व पुरुष तेथून निघून गेले.
या प्रकरणी रविंद्र ज्योती जाधव, सावित्री रविंद्र जाधव, ज्योतीराम रविंद्र जाधव, मधुकर ज्योती जाधव, गणेश पुरुषोत्तम जाधव, उमेश पुरुषोत्तम जाधव, महेश सुरेश जाधव, सज्जन उर्फ राजेंद्र मोहन जाधव आणि इतर सहा ते सात अनोळखी महिला व पुरुषांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ३५१(२), ३५२, ३२९(४), १८९(२) व १९० अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ८२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे
या घटनेचा तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपासाची  पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी जाधव (बक्कल हे करीत आहेत 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages