विरोधी पक्षाच्या मागणीला यश; स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाच हजारांची दिवाळी अग्रीम रक्कम जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

विरोधी पक्षाच्या मागणीला यश; स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाच हजारांची दिवाळी अग्रीम रक्कम जाहीर

विरोधी पक्षाच्या मागणीला यश; स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाच हजारांची दिवाळी अग्रीम रक्कम जाहीर



 करमाळा,(कटूसत्य वृत्त):-  करमाळा नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या कार्यकाळात दिल्या जाणाऱ्या दिवाळी अग्रीम रकमेच्या धर्तीवर यंदाही स्वच्छता कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मागणीला अखेर यश आले असून, नगरपालिका प्रशासनाने कायम सेवेत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम रक्कम जाहीर केली आहे.

        दरम्यान, प्रशासनाने कायमस्वरूपी सेवेत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी अग्रीम रक्कम जाहीर केली असली तरी कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना अद्याप याचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही तातडीने दिवाळी अग्रीम रक्कम जाहीर करून ती वितरित करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळे, नगरसेवक युवराज चिवटे, नगरसेविका अश्विनी कांबळे-अब्दुले, सुवर्णा आलाट आणि साजेदा कुरेशी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages