दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दहिगाव योजनेचे पाणी सोडण्याची मागणी; आमदार नारायण पाटील यांची विखे-पाटलांशी चर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 6, 2026

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दहिगाव योजनेचे पाणी सोडण्याची मागणी; आमदार नारायण पाटील यांची विखे-पाटलांशी चर्चा

 दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दहिगाव योजनेचे पाणी सोडण्याची मागणी; आमदार नारायण पाटील यांची विखे-पाटलांशी चर्चा





करमाळा

(कटूसत्य वृत्त):-    तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती, अनियमित पाऊस आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता दहिगाव उपसा जलसिंचन योजनेतून तातडीने पाणी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. अल निनोचा संभाव्य प्रभाव आणि यंदाच्या पावसाची अनिश्चितता लक्षात घेता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात झालेला अनियमित पाऊस, खरीप हंगामातील पिकांचे झालेले नुकसान, रब्बी हंगामासाठी पाण्याची अनिश्चितता तसेच आगामी काळात उद्भवू शकणारी पाणीटंचाई या महत्त्वाच्या बाबींकडे आमदार पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधले. दहिगाव उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संभाव्य पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता या योजनेतून तातडीने पाणी आवर्तन सोडण्याबाबत संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी यावेळी केली. करमाळा तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसातील अनियमिततेचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. अशा परिस्थितीत दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी वेळेत उपलब्ध झाल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे आमदार पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केलेल्या या मागणीकडे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages