दुष्काळाची तीव्रता गंभीर! सोलापूर जिल्ह्यात १३५ गावांना टँकरने पाणीपुरवठा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 3, 2026

दुष्काळाची तीव्रता गंभीर! सोलापूर जिल्ह्यात १३५ गावांना टँकरने पाणीपुरवठा

दुष्काळाची तीव्रता गंभीर! सोलापूर जिल्ह्यात १३५ गावांना टँकरने पाणीपुरवठा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात यंदा दिवाळीच्या सणावर दुष्काळाचे सावट असून, शेतकरी पाणी आणि चाऱ्याच्या टंचाईने त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी दौरा सुरू केला आहे. आज आणि उद्या ते सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांना भेट देणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले. सध्या आपण दुष्काळाची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत असून, आज माढा तालुक्यातील दुधाळी परिसराला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक आमदारही त्यांच्यासोबत असणार असून, तेथील परिस्थितीची सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेतली जाणार आहे.

शेतकऱ्यांसमोर सध्या sharad pawar पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती सांगताना पवार म्हणाले की, जिल्ह्यातील १३९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या १३५ टँकरच्या माध्यमातून पाणी पोहोचवले जात आहे. तर, एकट्या माढा तालुक्यात ११० टँकर सुरू आहेत. या आकडेवारीवरून दुष्काळाची तीव्रता लक्षात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्यावर आपण भर देणार असल्याचे पवार यांनी सांगितले. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासंदर्भात राज्य सरकारकडेही मदतीची मागणी करणार असून, सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मार्ग काढण्याबाबत आपण यापूर्वीच दिल्लीत तसेच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली असल्याची माहितीही पवार यांनी दिली. या चर्चेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निश्चितच काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, दुष्काळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीतील इंडिया आघाडीचे आंदोलन, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, सरकारची भूमिका आणि उजनी परिसरातील एआय डेटा सेंटर या विषयांवरही माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages